दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा!

सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्रासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटींपासून वाचण्यासाठी राम गोपाल वर्म हा चित्रपट वेबवर रिलीज करत असल्याचं म्हटलं जात आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा!

हैदराबाद : निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्माविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'गॉड, सेक्स अँड ट्रूथ'मधून अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली हैदराबादमध्ये त्याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

आरजीव्हीच्या 'गॉड, सेक्स अँड ट्रूथ'मध्ये अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवा आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार केल्याप्रकरणी, राम गोपाल वर्माविरोधात आयटी अॅक्ट 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राम गोपल वर्माचा पॉर्न स्टारसोबत सिनेमा, पोस्टर रिलीज

एका सामाजिक कार्यकर्त्या देवी आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या तक्रारीनंतर सेंट्रल क्राईम स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. वर्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंपैकी एक फोटो अश्लील असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

दुसरीकडे महिलांच्या एका गटाने सिनेमावर बंदी घालून वर्माला तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी हैदराबादमध्ये आंदोलन केलं.

हा सिनेमा आज सकाळी 9 वाजता वेबवर प्रदर्शित झाला आहे. सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्रासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटींपासून वाचण्यासाठी राम गोपाल वर्म हा चित्रपट वेबवर रिलीज करत असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच वर्मा महिलांना सेक्स ऑब्जेक्ट म्हणून दाखवत पॉर्नोग्राफीचा प्रसार करत आहे, असाही आरोप करण्यात येत आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ram Gopal Varma booked for obscenity
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV