राम गोपल वर्माचा पॉर्न स्टारसोबत सिनेमा, पोस्टर रिलीज

राम गोपाल वर्माने नुकतंच एका अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवासोबत युरोपमध्ये व्हिडीओचं शूटिंग केलं.

राम गोपल वर्माचा पॉर्न स्टारसोबत सिनेमा, पोस्टर रिलीज

मुंबई : बॉलिवूड निर्मता दिग्दर्शक पुन्हा एकदा धमका केला आहे. त्याने त्याच्या आगामी गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय बोल्ड आहे आणि त्याने ते ट्विटरवर शेअर केलं आहे. या चित्रपटात त्याने प्रसिद्ध पॉर्न स्टार मिया मालकोवाला संधी दिली आहे. पोस्टरमध्ये मिया फारच बोल्ड अंदाजात दिसत आहे.

राम गोपाल वर्माने नुकतंच एका अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवासोबत युरोपमध्ये व्हिडीओचं शूटिंग केलं. 16 जानेवारीला सकाळी 9 वाजता ह्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणार आहे.

मिया मालकोवाने गुरुवारी ट्विटरवर राम गोपाल वर्मासोबत काम केल्याचा अनुभव शेअर केला. "भारतीय दिग्दर्शक राम गोपाल वर्माने युरोपमध्ये माझ्यासोबत गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ नावाचा व्हिडीओ शूट केला. सनी लिऑनीनंतर भारतीय दिग्दर्शकासोबत काम करणारी मी दुसरी अडल्ट स्टार आहे, असं ट्वीट मिया मालकोवाने केलं आहे. तिने राम गोपाल वर्माचे आभारही मानले.मियाच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना राम गोपाल म्हणाला की, "मिया... गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथचं चित्रकरण हा विचार आणि कल्पनाशक्तीला चालना देणारा अनुभव होता. यातून मला अनेक आयडिया मिळाल्या आहेत. मी कधीही सनी लिऑनसोबत काम केलं नाही, पण गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथच्या शूटिंगचा अनुभव मी कधीही विसरु शकत नाहीत."

रामगोपाल वर्मा ने लिखा, "मिला मालकोवा, तू जशी आहेस, त्यासाठी मी तुझे आभार मानतो आणि ज्या पद्धतीने स्वत:चे विचार मांडण्याची पद्धत आहे, त्याचं कौतुक आणि सन्मान करतो. तू एक कलाकृती आहे आणि मी केवळ एक फ्रेम बनवण्याचं काम करत आहे. #GodSexTruth"आणखी एका ट्वीटमध्ये राम गोपाल वर्मा म्हणाला की, "इथे जीएसटी टॅक्स म्हणून नाही तर गॉड, सेक्स अॅण्ड ट्रूथ आहे. मिया मालकोवासोबत या सिनेमाचं चित्रीकरण केलं. फीचर फिल्मच्या दिग्दर्शक-निर्मात्यांनी सनी लिऑनीनंतर एखाद्या अडल्ट स्टारसोबत काम करण्याची ही दुसरी वेळ आहे."सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ram Gopal Varma shoots a video with adult film star Mia Malkova
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV