होळीला राम गोपाल वर्माचं पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्वीट

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Monday, 13 March 2017 8:36 AM
होळीला राम गोपाल वर्माचं पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्वीट

मुंबई : महिला दिनी अभिनेत्री सनी लिओनचा संदर्भ घेत दिग्दर्शक राम गोपाल वर्माने आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यावरुन उठलेला वादंग शांत होत नाही, तोच त्याने आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. होळीच्या शुभेच्छा देताना पुन्हा एकदा त्याने हीन मानसिकतेचं दर्शन घडवलं आहे.

‘होळी हा वर्षातला एकमेव असा दिवस आहे, जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांना ओल्या कपड्यात पाहू शकतात आणि स्पर्श करु शकतात’, असं ट्वीट राम गोपाल वर्माने केलं आहे. ‘मला माहित नाही, कोणत्या देवाने कोणत्या राक्षसाचा वध केला, पण असे मादक क्षण निर्माण केल्याबद्दल मी राक्षसांचे आभार मानतो’ असंही वर्माने म्हटलं आहे.

Ram Gopal Verma Holi Tweet 1

120 कोटी जनतेपैकी एकाला तरी होळी साजरा करण्याचं कारण माहित आहे का, मला शंका वाटते. पण सगळे भांग पितात, असंही त्याने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे रंगपंचमीच्या दिवशी त्याच्यावर टीकेचेच रंग पुन्हा उधळले जाण्याची शक्यता आहे.

Ram Gopal Verma Holi Tweet 2

 

‘सनी लिओन जितका आनंद देते, तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा, अशी इच्छा आहे’ असं ट्वीट राम गोपाल वर्मांनी केलं होतं. त्यावर आक्षेप घेत राम गोपाल वर्मांनी माफी मागावी, किंवा परिणामांना सामोरं जावं, कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता.

जागतिक महिला दिन साजरा होत असताना दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये ट्विटरयुद्ध पेटलं होतं.

संबंधित बातम्या :

राम गोपाल वर्मांचं महिला दिनी वादग्रस्त ट्वीट

माफी मागा किंवा परिणामांना सामोरं जा, आव्हाडांचा वर्मांना इशारा

First Published: Monday, 13 March 2017 8:36 AM

Related Stories

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना

रिलीजआधीच रजनीकांतच्या '2.0' ने 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला!
रिलीजआधीच रजनीकांतच्या '2.0' ने 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडला!

मुंबई : प्रभासच्या ‘बाहुबली 2’ आणि रजनीकांत-अक्षय कुमार यांच्या

लोकसभाध्यक्षांकडून 'दंगल'चं स्क्रीनिंग, चित्रपट पाहून खासदार भारावले
लोकसभाध्यक्षांकडून 'दंगल'चं स्क्रीनिंग, चित्रपट पाहून खासदार...

नवी दिल्ली : मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या आमीर खानच्या

झिंगाट, सैराट, आर्ची-परशा कळले, पण प्रबोधन झालं नाही : नागराज मंजुळे
झिंगाट, सैराट, आर्ची-परशा कळले, पण प्रबोधन झालं नाही : नागराज मंजुळे

पिंपरी चिंचवड : ‘सैराट’ सिनेमाने लोकांच्या मनावर अधिराज्य जरी

अभिनेत्री रिंकू राजगुरुची छेडछाड, ठाण्याचा तरुण ताब्यात
अभिनेत्री रिंकू राजगुरुची छेडछाड, ठाण्याचा तरुण ताब्यात

पंढरपूर : ‘सैराट’ फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची

पाठकबाई म्हणतात, जय.. का रे दुरावा?
पाठकबाई म्हणतात, जय.. का रे दुरावा?

मुंबई : ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरु असलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’

'बाहुबली 2' मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट
'बाहुबली 2' मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासनं बाहुबली 2 या आगामी

रिलीजआधी सलमान खानच्या 'ट्यूबलाईट'चा विक्रम!
रिलीजआधी सलमान खानच्या 'ट्यूबलाईट'चा विक्रम!

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाईट’ सिनेमाविषयी

अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमान अव्वल
अॅडव्हान्स टॅक्स भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सलमान अव्वल

मुंबई : अॅडव्हान्स टॅक्स भरण्यात बॉलिवूडचा सुलतान सलमान खानने