रणबीर कपूरने गोविंदाची माफी मागितली!

By: | Last Updated: > Wednesday, 12 July 2017 4:10 PM
Ranbir Kapoor apologises for cutting Govinda’s role in Jagga Jasoos

मुंबई : ‘जग्गा जासूस’ सिनेमातील गोविंदाची भूमिका कापल्याची संपूर्ण जबाबदारी अभिनेता रणबीर कपूरने स्वीकारली आहे. शिवाय याबाबत रणबीरने गोविंदाची माफीही मागितली आहे.

गोविंदा जग्गा जासूसच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचं वृत्त होतं. या सिनेमात गोविंदाला भूमिका देण्यात आली होती. पण सिनेमाच्या चित्रीकरणाला उशिर झाल्याने कथेमध्ये बदल करुन गोविंदाचा रोल कापण्यात आला. गोविंदाने या भूमिकेचे काही दृश्यही चित्रीत केली होती. पण मी चित्रपटाचा भाग नसूनही माझ्या फोटोचा वापर सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी केला जात असल्याचं गोविंदाचं म्हणणं आहे.

यासंदर्भात बोलताना रणबीरने म्हणाला की, “दुर्दैवाने, स्क्रिप्टमध्ये बदल करताना त्यांची (गोविंदा) पूर्ण भूमिकाच कापण्यात आली. हा चित्रपट घाईगडबडीनेच सुरु केला होता. त्यावेळी संपूर्ण कथा तयार नव्हती. यानंतर सिनेमातील व्यक्तिरेखा पूर्णपणे बदलण्यात आल्या, कारण सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आधीच फार उशिर झाला होता.”

“गोविंदासारख्या महान कलाकाराला आम्ही सिनेमात घेतलं पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला नाही, याचं मला दु:ख आहे. आम्ही सगळे याबाबत माफी मागतो. परंतु सिनेमा चांगला बनण्यासाठी यातील काही भाग कापणं आवश्यक होतं,” असंही रणबीर पुढे म्हणाला.

गोविंदाची भूमिका कापल्यानंतर दिग्दर्शक अनुराग बासूने बंगाली अभिनेता सास्वत चॅटर्जी यांची निवड केली, ज्यांनी या चित्रपटात रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. सास्वत चॅटर्जीने याआधी हिंदी चित्रपट ‘कहानी’मध्ये मारेकरी बॉबची भूमिका साकारली होती.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Ranbir Kapoor apologises for cutting Govinda’s role in Jagga Jasoos
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!
सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे.

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर
येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा

अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक
अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक झाला

भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये

मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच

... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!
... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता

म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द
म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द

मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील

आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल
आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल

मुंबई : यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न