रणबीरच्या अरेंज मॅरेजसाठी आई नीतू कपूरचं वधूसंशोधन

सर्व अभिनेत्रींना बाद करत कपूर खानदानात वेगळ्याच सूनबाई येण्याची चिन्हं आहेत. कारण नीतू सिंग यांनी लेकाच्या लग्नाचं मनावर घेतलं आहे.

रणबीरच्या अरेंज मॅरेजसाठी आई नीतू कपूरचं वधूसंशोधन

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर बॉलिवूडमधल्या एखाद्या अभिनेत्रीसोबत लव्ह मॅरेज करेल, असा अंदाज चाहत्यांप्रमाणेच अनेक सेलिब्रेटींनी बांधला होता. मात्र हा अंदाज खुद्द रणबीरची आईच खोटं ठरवण्याची शक्यता आहे. कारण टिपीकल आईवर्गाप्रमाणे नीतू सिंग-कपूर यांनीही लेकासाठी वधूसंशोधन सुरु केलं आहे. त्यामुळे रणबीरचं अरेंज मॅरेज होण्याची शक्यता आहे.

रणबीर कपूर हा बॉलिवूडमधला मोस्ट एलिजिबल बॅचलर मानला जातो. त्याचं नाव आधी दीपिकासोबत जोडलं गेलं. त्यानंतर कतरिना कैफ त्याच्या आयुष्यात आली. नुकत्याच माहिरा खानसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा होत्या. मात्र या सर्व अभिनेत्रींना बाद करत कपूर खानदानात वेगळ्याच सूनबाई येण्याची चिन्हं आहेत. कारण नीतू सिंग यांनी लेकाच्या लग्नाचं मनावर घेतलं आहे.

सूनबाई म्हणून नीतू सिंगच्या मनात अजुनही दीपिका पदुकोनच?


रणबीरने लग्न करावं आणि सेटल व्हावं, असा नीतू यांचा अट्टाहास असल्याचं 'मुंबई मिरर'मधल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रणबीर मात्र हातात अनेक चित्रपट असल्याचं कारण पुढे करत यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आईनेच चंग बांधल्यामुळे रणबीरचाही नाईलाज झाला आहे.

रणबीर-माहिराचं अफेअर असतं, तर आतापर्यंत अख्ख्या मुंबईला समजलं असतं, असं म्हणत रणबीरचे वडील- ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या प्रेमप्रकरणाच्या अफवा उडवून लावल्या होत्या. रणबीर आणि माहिरा यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चांना उत आला होता.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ranbir Kapoor may tie knot soon, mom Neetu Kapoor looking for arrange marriage latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV