'जग्गा जासूस'ची पहिल्या दिवसाची कमाई...

बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' सिनेमाला फार चांगली ओपनिंग मिळाली नाही.

'जग्गा जासूस'ची पहिल्या दिवसाची कमाई...

मुंबई : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या 'जग्गा जासूस' सिनेमाला फार चांगली ओपनिंग मिळाली नाही. दिग्दर्शक अनुराग बासूची मेहनत, रणबीर कपूरचा दमदार अभिनय आणि 110 कोटी रुपये खर्च करुनही हा चित्रपट प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकला नाही.

सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 8 कोटी 57 लाख रुपयांची कमाई केली. ट्रेन अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन याची माहिती दिली. चित्रपटाचा बजेट पाहता ही कमाई सरासरीपेक्षाही कमी असल्याचं म्हटलं जात आहे.

https://twitter.com/taran_adarsh/status/886081121594863621

रणबीर आणि कतरिनाचा 'जग्गा जासूस' 14 जुलै रोजी भारतातील 1800 पेक्षा जास्त स्क्रीन आणि परदेशातील 610 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता.

मात्र या चित्रपटाचे रिव्ह्यू फार चांगले आलेले नाहीत. समीक्षकांनी सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तरण आदर्श यांनीही हा सिनेमा सहन करण्यापलिकडचा असल्याचं सांगितलं.

https://twitter.com/taran_adarsh/status/886017686257500160

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV