रणवीर-दीपिकाची 'गुंतवणूक', गोव्यात बंगला खरेदी?

सुनिल गावसकर आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा बंगला असलेल्या परिसरातच दीपिका-रणवीरने घर खरेदी केल्याची माहिती आहे.

रणवीर-दीपिकाची 'गुंतवणूक', गोव्यात बंगला खरेदी?

मुंबई : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण चोरीछुपे साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांना वर्षाच्या सुरुवातीला उधाण आलं होतं. अद्याप दोघांनीही आपल्या रिलेशनशीपला अधिकृत दुजोरा दिला नसला, तरी त्याबाबतचे संकेत वारंवार मिळतात. त्यातच, रणवीर-दीपिकाने आता बंगल्यात एक पॉश बंगला विकत घेतल्याची माहिती आहे.

रणवीर आणि दीपिका यांची मनं एकमेकात किती गुंतली आहेत, हे पाहायला मिळतंच, पण आता दोघांनी स्थावर मालमत्तेत एकत्र गुंतवणूक केल्याचं म्हटलं जात आहे. गोव्यात दोघांनी एक शानदार बंगला विकत घेतल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत.

माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा बंगला असलेल्या परिसरातच दीपिका-रणवीरने घर खरेदी केल्याची माहिती आहे.

रणवीर सिंगच्या टीमने मात्र हे वृत्त फेटाळून लावलं आहे. रणवीरने यापूर्वीच गोव्यात एखाद्या मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा मानस बोलून दाखवला होता. तिथूनच काम करण्याचा त्याचा इरादा होता, मात्र मुंबईत घर घेतल्यास बरं पडेल, अशा विचाराने त्याने हा मनसुबा बदलला होता.

रणवीरच्या आई-वडिलांकडून दीपिकाला वाढदिवसाचं खास गिफ्ट!


वांद्र्यात राहणाऱ्या रणवीरच्या आजीच्या घरी दीपिकाने नुकतीच हजेरी लावली होती. दीपिकाला भेटण्याची आजीचीच इच्छा असल्यामुळे रणवीर तिला घरी घेऊन गेला होता.

लग्नासाठी रणवीर आणि दीपिकाच्या आई-वडिलांनी तयारी दर्शवली असल्याचं म्हटलं जातं. रणवीरच्या आई-वडिलांनी दीपिकाला बर्थ डे गिफ्ट म्हणून एक महागडा डायमंड सेट आणि सब्यसाचीने डिझाईन केलेली साडी दिली. हे गिफ्ट दीपिकाला अतिशय आवडलं आहे.

दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा?


दीपिका 5 जानेवारीला म्हणजे तिच्या वाढदिवशीच रणवीरसोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण दोघेही सुट्टीवरुन परतल्यानंतर त्यांनी साखरपुडा किंवा लग्न केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

रणवीर आणि दीपिका लवकरच बहुप्रतिक्षीत 'पद्मावत' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ranveer Singh and Deepika Padukone bought bungalow in Goa together? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV