एक्स गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्माच्या लग्नानंतर रणवीर म्हणतो...

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माने यशराज बॅनरच्या 'बॅण्ड बाजा बारात' या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

एक्स गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्माच्या लग्नानंतर रणवीर म्हणतो...

मुंबई : एक काळ होता, ज्यावेळी अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह एकमेकांच्या अतिशय जवळ होते. दोघांचं अफेअर असल्याचीही चर्चा होती. मात्र दोघांनी कधीही ते मान्य केलं नाही. परंतु अनुष्काने क्रिकेटर विराट कोहलीसोबत लग्न केल्यानंतर रणवीरने तिच्याबद्दल कौतुकाचे उद्गार काढले आहेत.

फोर्ब्ज मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंह म्हणाला की, "अनुष्का किती पुढे निघून गेली, हे फारच सुखद आहे. ती एक शानदार अभिनेत्री आहे. तिच्या करिअरचा ग्राफ सॉलिड आहे. स्वत:च्या हिंमतीवर ती आज या ठिकाणी पोहोचली आहे. ती स्वत:बद्दल आणि स्वत:च्या आवडीबाबत अतिशय स्पष्ट आहे. माझ्याकडून योग्यरित्या काम झालं नाही तर आदित्य चोप्रा मला अनुष्काचं उदाहरण देऊन सांगतात की, तू नालायक आहे, अनुष्काकडून काहीतरी शिक."

रणवीर सिंह आणि अनुष्का शर्माने यशराज बॅनरच्या 'बॅण्ड बाजा बारात' या सिनेमात एकत्र काम केलं होतं. तेव्हाही अनुष्काबद्दल बोलताना रणवीर सिंह म्हणाला होता की, "ती सौंदर्य, कौशल्य आणि बुद्धिमत्तेचं उत्तम मिश्रण आहे."

अनुष्का शर्मासोबतच्या नात्याबद्दल बोलताना रणवीर सिंह सांगतो की, "आजही आमच्यात दृढ मैत्री आहे. ती एक प्रामाणिक अभिनेत्री आहे."

सध्या रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबरला इटलीच्या सिएन्ना प्रांतातल्या ब्युऑनकॉनव्हेन्टो शहरात लग्न केलं होतं. त्यानंतर 21 डिसेंबरला विरुष्काच्या लग्नाचं पहिलं रिसेप्शन दिल्लीत पार पडलं होतं. तर 26 डिसेंबरला मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन झालं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ranveer Singh praises ex-girlfriend Anushka Sharma after her wedding with Virat Kohli
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV