रणवीरच्या आई-वडिलांकडून दीपिकाला वाढदिवसाचं खास गिफ्ट!

दरम्यान, रणवीर आणि दीपिका लवकरच बहुप्रतिक्षीत 'पद्मावत' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

रणवीरच्या आई-वडिलांकडून दीपिकाला वाढदिवसाचं खास गिफ्ट!

मुंबई : रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या लग्नाची चर्चा सध्या मीडियामध्ये आहे. दीपिका 5 जानेवारीला म्हणजे तिच्या वाढदिवशीच रणवीरसोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा होती. पण दोघेही सुट्टीवरुन परतल्यानंतर त्यांनी साखरपुडा किंवा लग्न केलं नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मात्र लग्नासाठी रणवीर आणि दीपिकाच्या आई-वडिलांनी तयारी दर्शवली आहे, असं वृत्त आहे. रणवीरच्या आई-वडिलांनी दीपिकाला बर्थ डे गिफ्ट म्हणून एक महागडा डायमंड सेट आणि सब्यासाचीने डिझाईन केलेली साडी दिली. हे गिफ्ट दीपिकाला अतिशय आवडलं आहे.

रणवीरच्या कुटुंबीयांना दीपिका आवडते तर दीपिकाच्या कुटंबालाही रणवीर जावई म्हणून पसंत असल्याचं कळतं. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी होकार दिल्याचं म्हटलं जात आहे. आता दोघे आपल्या लग्नाची घोषणा कधी करणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

दरम्यान, रणवीर आणि दीपिका लवकरच बहुप्रतिक्षीत 'पद्मावत' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 26 जानेवारी रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ranveer Singh’s parents gives special gift to Deepika Padukone
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV