सलमानचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 11 मधून बाहेर पडलेल्या जुबैर खानने सलमान खानविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता सलमानचा सर्वात जवळचा आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

सलमानचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस 11 मधून बाहेर पडलेल्या जुबैर खानने सलमान खानविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता सलमानचा सर्वात जवळचा आणि त्याचा बॉडीगार्ड शेराविरोधात बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

महिलेचा आरोप काय?
महिलेच्या आरोपानुसार, "जुबेर खानच्या प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी शेराने सांगितलं होतं. पण नकार दिल्याने त्याने बलात्कार करण्याची धमकी दिली. शेराविरोधात भारतीय दंडविधान कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

तक्रारदार महिला कोण?
गुन्हा नोंदवणारी महिला एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते. बिग बॉसमधून हकालपट्टी झालेल्या जुबेरने सलमानवर गैरवर्तणुकीचा आरोप करत लोणावळ्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने त्याला मदत केली. आपण जुबेरची बहिण असल्याचा दावा महिलेने केला आहे. जुबेर बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती अनेकदा त्याच्यासोबत दिसली आहे.

शेराने आरोप फेटाळले
परंतु शेराने हे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्या महिलेशी कोणताही संबंध नसल्याचा दावा शेराने केला. तसंच ही महिला कोण आहे हेदेखील माहित नसल्याचं शेराने सांगितलं.

शेरा 20 वर्षांपासून सलमानसोबत
शेराचं खरं नाव गुरमीत सिंह जॉली आहे. पण त्याला शेरा नावानेच ओळखलं जातं. सलमानसाठी शेरा कुटुंबातील सदस्यासारखा आहे. सलमानला ज्या ठिकाणी जायचं असतं, शेरा त्या ठिकाणी एक दिवस आधीच जाऊन तिथली पाहणी करतो. शेराने बॉडीबिल्डिंगमध्ये ज्युनिअर मिस्टर मुंबई आणि ज्युनिअर मिस्टर महाराष्ट्र यांसारखे पुरस्कार जिंकले आहेत.

शेरा कंपनीचा मालक
शेरा सलमानचं एका मित्राप्रमाणे संरक्षण करतो. तो मुंबईत सलमानच्या जवळच राहत असे. त्यानंतर तो सलमानचा बॉडीगार्ड बनला. सलमानच्या सांगण्यावरुन मागील वर्षी त्याने स्वत:ची विजक्राफ्ट ही कंपनीही सुरु केली. यासोबतच त्याची 'टायगर सिक्युरिटी' ही कंपनीही आहे, जी सेलिब्रिटींना सुरक्षा पुरवते.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV