दोघींची आयुष्यात 'कॉमन चूक', रविना-शिल्पाचा अक्षयला टोमणा?

'प्रत्येकजण आयुष्यात गोलमाल करतो. मी आणि शिल्पाने पण केला आहे. तुला कळलं ना मी काय म्हणत आहे?' असं रविना म्हणताच शिल्पाने तिला दाद दिली.

दोघींची आयुष्यात 'कॉमन चूक', रविना-शिल्पाचा अक्षयला टोमणा?

मुंबई : बॉलिवूडमधील अफेअर्सच्या चर्चा न संपणाऱ्या आहेत. काही जणांची प्रेम-प्रकरणं अयशस्वी होतात, तर काहींचा वर्षांनुवर्षांचा सुखी संसार होतो, तर काही जण दशकभरानंतर काडीमोड घेतात. अक्षयकुमारचंही लग्नापूर्वी अनेक अभिनेत्रींसोबत प्रेमप्रकरण गाजलं होतं. अक्षयच्या दोन एक्स गर्लफ्रेण्ड समोरासमोर आल्या आणि त्यांनी चक्क खिलाडीकुमारलाच टोमणा मारला.

सुपर डान्स 2 च्या सेटवर रविना टंडन आणि शिल्पा शेट्टी एकत्र आल्या. शिल्पा आणि रविना या दोघींनी अक्षयला लग्नापूर्वी डेट केलं आहे. कार्यक्रमात रविना म्हणाली, मी आयुष्यात खूप चुका केल्या आहेत. त्यावर डोळा मारत शिल्पा म्हणाली, आपण केलेल्या काही चुका सारख्याच आहेत. शिल्पाने मारलेला हा टोमणा अक्षयसाठी होता, हे सर्वांच्या लक्षात आलं आणि सेटवर हास्यकल्लोळ माजला. 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टमध्ये या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे.

हा किस्सा एवढ्यावरच थांबला नाही. आयुष्यात केलेल्या गोलमालबाबत चर्चा सुरु असताना रविनाने पुन्हा टोला लगावला. 'प्रत्येकजण आयुष्यात गोलमाल करतो. मी आणि शिल्पाने पण केला आहे. तुला कळलं ना मी काय म्हणत आहे?' असं रविना म्हणताच शिल्पाने तिला दाद दिली. दोघांनी अक्षयचं नामोल्लेख टाळत त्याला यथेच्छ टोमणे लगावले.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना 2001 साली विवाहबंधनात अडकले. मात्र 90 च्या दशकात अक्षयचं नाव रविना टंडन, शिल्पा शेट्टी सारख्या आघाडीच्या अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. शिल्पा शेट्टीने 2009 मध्ये राज कुंद्रासोबत लगीनगाठ बांधली, तर रविनाचं 2004 मध्ये अनिल थडानीशी लग्न झालं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Raveena Tandon and Shilpa Shetty called Akshay Kumar common mistake? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV