म्हणून चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्वर्याचा नकार?

ऐश्वर्याने थेट नकार देण्याऐवजी आपल्या मानधनाचा आकडा प्रचंड वाढवून मागितला. तसं केल्याने 'झाकली मूठ' राहत असल्याचा अॅशचा समज असला तरी तिचे पत्ते उघड झाले आहेत.

By: | Last Updated: > Monday, 4 September 2017 11:09 PM
Real Reason Why Aishwarya Rai Bachchan Said No to Chiranjeevi latest update

मुंबई : बिग बींच्या सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनची सध्या बॉलिवूडमध्ये सेकंड इनिंग सुरु आहे. मात्र पुनरागमनानंतरही ऐश्वर्या फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. चित्रपटांच्या निवडीबाबत अत्यंत चोखंदळ झालेल्या ऐश्वर्याने ‘स्मार्ट’ पद्धतीने चिरंजीवी सोबत सिनेमा करण्यास नकार दिल्याचं म्हटलं जातं.

दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवीसोबत ‘से रा नरसिंहा रेड्डी’ या चित्रपटात भूमिका करण्यास ऐश्वर्याने नकार दिला. मूळात ऐश्वर्याने थेट नकार देण्याऐवजी आपल्या मानधनाचा आकडा प्रचंड वाढवून मागितला. तसं केल्याने ‘झाकली मूठ’ राहत असल्याचा अॅशचा समज असला तरी तिचे पत्ते उघड झाले आहेत.

ऐश्वर्याने कमबॅकनंतर फक्त तरुण अभिनेत्यांसोबत चित्रपट करण्यास पसंती दिली आहे. आर माधवनची क्रेझ खरं तर तरुणींमध्ये जास्त आहे, मात्र तो वयाने मोठा असल्याने ऐश्वर्याने त्याच्यासोबत जोडी जमवणं टाळलं. त्याच्याऐवजी निर्मात्यांना राजकुमार रावला साईन करण्यास तिने भाग पाडलं.

एका पिरीएड ड्रामामध्ये साठीतील चिरंजीवीची पत्नी साकारण्याची ऑफर ऐश्वर्याला आली होती. थेट नकार कळवण्याऐवजी ऐश्वर्याने 9 कोटी रुपयांचं मानधन मागितलं. साहजिकच पैशांवरुन बोलणी फिस्कटली आणि ऐश्वर्याला वाईटपणा घ्यावा लागला नाही.

ऐश्वर्याने आतापर्यंत समकालीन किंवा वयस्क अभिनेत्यांसोबत भूमिका केल्या आहेत. 2010 मध्ये हृतिकसोबत केलेल्या ‘गुझारिश’ चित्रपटानंतर तिने पाच वर्षांचा ब्रेक घेतला होता. सेकंड इनिंगमध्ये तिने जज्बा, सरबजीत त्याचप्रमाणे ऐ दिल है मुश्किल (रणबीर कपूर) अशा चित्रपटांमध्ये तरुण अभिनेत्यांसोबत पेअरिंग केलं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Real Reason Why Aishwarya Rai Bachchan Said No to Chiranjeevi latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही