राहुल गांधींच्या घराणेशाहीच्या टीकेमुळे ऋषी कपूर खवळले

कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढीला गुणवत्तेच्या बळावर जनतेने पसंती दिली आहे. 106 वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कपूर कुटुंबाने 90 वर्षांचं योगदान दिलं आहे.' असं ऋषी कपूर म्हणाले

By: | Last Updated: > Wednesday, 13 September 2017 7:14 PM
Rishi Kapoor slams Rahul Gandhi on ‘dynasty’ comments latest update

मुंबई : बर्कलेमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय राजकारणातील घराणेशाहीचा दाखला दिला होता. मात्र या टीकेमुळे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर चांगलेच संतापले आहेत. कपूर कुटुंबातील प्रत्येक जण गुणवत्तेच्या जोरावर इथवर पोहचल्याचं ऋषी कपूर म्हणाले.

‘कपूर कुटुंबातील प्रत्येक पिढीला गुणवत्तेच्या बळावर जनतेने पसंती दिली आहे. 106 वर्षांच्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कपूर कुटुंबाने 90 वर्षांचं योगदान दिलं आहे.’ असं ऋषी कपूर म्हणाले. ‘देवाच्या दयेने आमच्या चार पिढ्या झाल्या. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, रणधीर कपूर, रणबीर कपूर, चौघंही पुरुष.’ असं पुढच्या ट्वीटमध्ये ऋषी कपूर म्हणाले.

 

 

 

बर्कलेत कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये झालेल्या भाषणात राहुल गांधींनी भारतातील घराणेशाहीवर वक्तव्य केलं होतं. कपूर कुटुंबाचा थेट उल्लेख राहुल गांधींनी केला नसला, तरी ऋषी कपूर यांचं पित्त खवळलं आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

‘भारतातील बहुसंख्य पक्षांची हीच समस्या आहे. अखिलेश यादव हे घराणेशाहीतून आले. द्रमुकच्या करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन हेही त्याचं उदाहरण. इतकंच काय, अभिषेक बच्चनही घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये आहेत. अंबानी, इन्फोसिस यांचंही काही वेगळं नाही. अशाचप्रकारे भारतात काम चालतं. त्यामुळे माझ्या मागे लागू नका. ‘ असं राहुल गांधी म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी माझ्यापेक्षा उत्तम वक्ता : राहुल गांधी

गेल्या वर्षीही ऋषी कपूर काँग्रेस पक्षावर चांगलेच भडकले होते. गांधी कुटुंबावरुन रस्ते आणि इमारतींना काँग्रेसने नावं दिल्याची टीका केल्याने ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

राहुल गांधी झोपेत होते की दारु प्यायले होते? : लोणीकर

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Rishi Kapoor slams Rahul Gandhi on ‘dynasty’ comments latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सलमान खान लवकरच बाबा होणार?
सलमान खान लवकरच बाबा होणार?

मुंबई : बॉलिवूडचा मोस्ट एलिजिबल बॅचलर सलमान खान लग्न कधी करणार हा

व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?
व्हेंटिलेटरची ऑस्करवारी हुकल्याने प्रियंका चोप्राचा हिरमोड?

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे न्यूटन चित्रपटाची अधिकृत एन्ट्री

नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
नागराज मंजुळे मुख्य भूमिकेत, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ‘फँड्री’, ‘सैराट’च्या यशानंतर मराठमोळा दिग्दर्शक

‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...
‘बाहुबली’ला ऑस्करसाठी नामांकन न मिळाल्याबद्दल राजामौली म्हणतो...

हैदराबाद : ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ सिनेमाला ऑस्कर नामांकन न

'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता
'पीपली लाईव्ह'चे दिग्दर्शक महमूद फारुकीची रेप प्रकरणातून मुक्तता

नवी दिल्ली : ‘पीपली लाईव्ह’ चित्रपटाचे सहदिग्दर्शक महमूद फारुकी

1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत
1983 विश्वचषकावरील चित्रपटात रणवीर कपिल देवच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू

न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट
न्यूटन हा 'या' अभिनेत्याचा ऑस्करवारी करणारा आठवा चित्रपट

मुंबई : ऑस्करसाठी भारतातर्फे पाठवण्यात आलेल्या ‘न्यूटन’

'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा
'पद्मावती'मधील शाहिदच्या लूकची इंटरनेटवर जोरदार चर्चा

मुंबई : संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ सिनेमातील दीपिका

वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं
वरुणने 'टन टना टन'मधून गोविंदाचं नाव हटवलं

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि गोविंदा यांच्यातील मतभेद वाढतच आहेत.

‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!
‘न्यूटन’ इराणी सिनेमाची कॉपी?, दिग्दर्शक अमित मसुरकरांनी मौन सोडलं!

मुंबई : ‘न्यूटन’ सिनेमाची सर्वच स्तरातून कौतुक होत असताना, वादही