प्रभासच्या बर्थडेला 'साहो' चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच

अॅक्शन-थ्रिलर साहो चित्रपटात प्रभास सोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय झळकणार आहेत.

प्रभासच्या बर्थडेला 'साहो' चित्रपटाचा फर्स्ट लूक लाँच

मुंबई : बाहुबली स्टार प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या आगामी 'साहो' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रभासच्या वाढदिवासाचा मुहूर्त साधत हा लूक लाँच करण्यात आला आहे.

बर्थ डे स्पेशल : प्रभासबद्दल माहित नसलेल्या 15 गोष्टी


अॅक्शन-थ्रिलर साहो चित्रपटात प्रभास सोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, अरुण विजय झळकणार आहेत. अभिनेत्री मंदिरा बेदीही खलनायिकेच्या भूमिकेत दिसण्याची चर्चा आहे. हैदराबाद, मुंबई आणि अबूधाबीमध्ये सिनेमाचं शूटिंग होणार आहे.

वाढत्या वजनामुळे प्रभासच्या 'साहो'तून अनुष्काचा पत्ता...

तेलुगू, तमिळ आणि हिंदी या तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणरा आहे. रन राजा रन (2014) फेम दिग्दर्शक सुजित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. मे 2018 मध्ये साहो रीलिज होण्याची शक्यता आहे.साहो चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरवर प्रभासचं अत्यंत गूढ रुप पाहायला मिळत आहे. प्रभासचा चेहरा अर्धा झाकलेला असून त्याचे फक्त डोळेच दिसत आहेत. साहोच्या फर्स्ट लूकमधून चित्रपटाच्या मूडचा अंदाज चाहते बांधत आहेत.

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?


सुमारे 150 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. या सिनेमासाठी प्रभासने त्याचं वजनही कमी केलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV