सई ताम्हणकरचं हटके सेलिब्रेशन, अॅब्ज दाखवत नववर्षाचं स्वागत

अभिनेत्री सई ताम्हणकर गेलं संपूर्ण वर्ष आपल्या फिटनेसबद्दल खूपच जागरुक होती. तिचं प्रोटीन डाएट देखील 2017 मधील चर्चेचा विषय होता. परंतु ही अशी परफेक्ट साईझ ठेवण्याचे किंवा अशाप्रकारे आगळे वेगळे फोटोशूट करण्याचे नेमके काय कारण असू शकते?

सई ताम्हणकरचं हटके सेलिब्रेशन, अॅब्ज दाखवत नववर्षाचं स्वागत

मुंबई : आजपर्यंत आपण अभिनेत्यांच्या सिक्स पॅक अॅब्जची चर्चा होताना अनेकदा पहिली असेल. मग तो अगदी शाहरुख, सलमान असो किंवा मराठीतला उमेश कामत  असो. पण सिक्स पॅक अॅब्स  म्हटलं कि हिरो असंच काहीसं गणित आपल्या डोक्यात येतं. परंतु 2018 च्या सुरुवातीला अभिनेत्री सई ताम्हणकर हिने हे गणित अगदी खोडून काढलंय. मुलींचा फिटनेस काय असतो हे सांगणारा एक उत्तम फोटो तिने रीव्हिल केलाय. ज्यात तिचे अॅब्स अगदी स्पष्ट दिसत आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकर गेलं संपूर्ण वर्ष आपल्या  फिटनेसबद्दल खूपच जागरुक होती. तिचं प्रोटीन डाएट देखील 2017 मधील चर्चेचा विषय होता. परंतु ही अशी परफेक्ट साईझ ठेवण्याचे किंवा अशाप्रकारे आगळे वेगळे फोटोशूट करण्याचे नेमके काय कारण असू शकते?

सईने या फोटोसाठी लिहिलेलं कॅप्शनही फोटो इतकंच भारी आहे -  I decide my vibe! “Every next level of your life will demand a different version of you”. Dear 2018, I am coming to slay!!  सईचं  हे फोटोशूट फोटोग्राफर तेजस नेरुरकर यांनी केलं आहे.

हे नवीन वर्ष अपेक्षेपेक्षा खूप जास्त ग्लॅमरस आणि जोरदार असणार आहे हे जसं तिच्या फोटोच्या कॅप्शनमधून वाचायला मिळत आहे, तसंच ते तिच्या कपड्यांमधूनही कळत आहे. एखाद्या चित्रपटाच्या सीनमधलं वाटावं असं हे भन्नाट फोटोशूट झालं आहे.

sai tamhankar new-compressed

सईचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे दोन फोटो नक्कीच नवीन वर्षाच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sai tamhankars new year celebration goes viral latest marathi news updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV