सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबत श्रीदेवीही झळकणार?

आपल्या लेकीचा डेब्यू ग्लॅमरस आणि लॅव्हिश व्हावा अशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची इच्छा आहे.

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबत श्रीदेवीही झळकणार?

मुंबई : 'सैराट' चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'मध्ये जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्यता आहे.

'आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी महत्त्वपूर्ण आहे. ती ग्रेसफुल दिसायला हवी. तिने स्वतःचा आब राखायला हवा. आईचं बंडखोर लेकीवर जीवापाड प्रेम आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास समाजातील तरुणावर मुलीचं प्रेम असल्यामुळे वडिलांचा तिला प्रचंड विरोध आहे. मात्र अशा परिस्थितीतही आईने तिची बाजू उचलून धरली आहे.' असं सिनेमाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.

श्रीदेवीची मुलगी हिंदी 'सैराट'मध्ये 'आर्ची'च्या भूमिकेत?


श्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्यता कमी आहे. सैराट चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र 'धडक'ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.

हिंदी सैराटचं कास्टिंग झालं, जान्हवी 'आर्ची', परशा कोण?


आपल्या लेकीचा डेब्यू ग्लॅमरस आणि लॅव्हिश व्हावा अशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची इच्छा आहे. निर्माता करण जोहर त्यांना निराश होऊ देणार नाही, अशी खात्री बाळगली जात आहे.

शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असून शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. डिसेंबरमध्ये सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 'धडक' 6 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. काहीच दिवसांपूर्वी सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात आलं.

'सैराट'च्या हिंदी रिमेकचं पोस्टर लाँच, सिनेमाचं नाव...


एप्रिल 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराटने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली होती. तर अनेक पुरस्कारही खिशात घातले.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sairat’s Hindi Remake Dhadak : Sridevi likely to make a cameo in daughter Janhvi kapoor’s debut film
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV