प्रभास सलमानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार?

प्रभास सलमानसोबत बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार?

मुंबई : 'बाहुबली'मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता सुपरस्टार प्रभाससोबत काम करण्यासाठी अनेक बॉलिवूड दिग्दर्शक आसूसले आहेत. आता यामध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीचं नाव आलं आहे. वृत्तानुसार, प्रभास आणि सलमान खानाल एकत्र घेऊन रोहित शेट्टीला चित्रपट बनवायचा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 'सिंघम'चा दिग्दर्शक रोहित शेट्टी प्रभास आणि सलमानला एकत्र घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत. जर रोहित बॉलिवूडमध्ये सलमानसोबत प्रभासची एन्ट्री करण्यास यशस्वी झाला तर त्याला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागणार आहे. कारण प्रभास 80 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम आकारतो.

प्रभास बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी अफवा याआधीही पसरली होती. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर प्रभाससोबत सिनेमा करणार असल्याची चर्चा होती. पण ही अफवा असल्याचं सिद्ध झालं. बाहुबलीचं यश पाहता प्रभासही त्याचे पुढील प्रोजेक्ट्स स्वीकारताना सतर्कता बाळगत आहे.

दरम्यान, रोहित शेट्टीने हे वृत्त फेटाळलं आहे. रोहित म्हणाला की, "ही फेक न्यूज आहे. मी फिअर फॅक्टरच्या शूटिंगसाठी मागील तीन आठवड्यांपासून स्पेनमध्ये आहे. मला कळत नाही अश अफवा कशा पसरतात?"

दुसरीकडे, प्रभास सध्या त्याचा आगामी चित्रपट 'साहू'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी त्याच्यासोबत रोमान्स करताना दिसेल. 150 कोटी रुपयांचं बजेट असलेला दिग्दर्शक सुजीतचा हा चित्रपट 2018 पर्यंत रिलीज होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV