मुलगी मिळाली पण..., सलमान खानचं ट्विटरवरुन स्पष्टीकरण

सलमान खानला लग्नाला मुलगी मिळाल्याचा तर्क काढून, अनेक जण आपला आनंद व्यक्त करत होते. पण आता त्यानं दुसरं ट्वीट करुन त्यावरचं स्पष्टीकरण दिलंय.

मुलगी मिळाली पण..., सलमान खानचं ट्विटरवरुन स्पष्टीकरण

मुंबई : 'मुझे लडकी मिल गयी'.... या सलमानच्या एका ट्वीटमधील चार शब्दांनी चाहत्यांमध्ये एकच धमाल उडवून दिली. सलमान खानला लग्नाला मुलगी मिळाल्याचा तर्क काढून, अनेक जण आपला आनंद व्यक्त करत होते. पण आता त्यानं दुसरं ट्वीट करुन आपल्याला मुलगी लग्नासाठी नव्हे, तर सिनेमासाठी मिळाल्याचं स्पष्ट केलं आहे.

'लव्हरात्री' या सिनेमासाठी सलमान खानला हिरोईन मिळाली आहे. वरिना नावाच्या अभिनेत्रीचं सिनेमासाठी कास्टिंग करण्यात आलं आहे.

बॉलिवूडचा मोस्ट एलिजीबल बॅचलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमानने आता वयाची पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी मिळाली का? असा पहिला प्रश्न साहजिकच चाहत्यांच्या मनात उमटला. कारण त्याच्या अफेअर्सची मालिका पाहता, आता तो कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला, याची उत्सुकता असते.

मुझे लडकी मिल गयी, सलमानचं ट्वीट, फॅन्समध्ये धुरळा

त्यावरुनच सलमानने आज सकाळी एक ट्वीट करुन धमाल उडवून दिली. ‘मुझे लडकी मिल गयी’ या त्याच्या चार शब्दांच्या एका ट्वीटने सोशल मीडियावर धमाल उडवून दिली. काहींनी आपला आनंद व्यक्त करताना, ‘भगवान के घर देर है पर अंधेर नही,’ अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी याचा संबंध ‘अच्छे दिन’शी जोडला.

सलमानला लग्नासाठी मुलगी मिळाली, की आगामी चित्रपटाला हिरोईन, असा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सलमानने हा सस्पेन्स फारसा ताणून न धरता खुलासा करुन टाकला.

'नथिंग टू वरी ना, आयुष शर्मा की फिल्म लव्हरात्री के लिये लडकी मिल गयी वरिना, तो डोंट वरी ना, बी हॅपी ना' असं ट्वीट सलमानने केलं. त्यासोबतच वरिनाचा फोटोही शेअर केला. वरिना हुसैन असं अभिनेत्रीचं नाव असल्याची माहिती आहे.सलमान खान कायमच स्टारकिड्स किंवा नवोदित अभिनेत्यांना बॉलिवूडमध्ये लाँच करत आला आहे. पुलकित सम्राट, सुरज पांचोली, आथिया शेट्टी, झरीन खान अशी यादी मोठी आहे. सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा आयुष शर्माला 'लव्हरात्री'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. 2018 च्या अखेरी 'लव्हरात्री' प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: salman khan another tweets that he found a girl
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV