वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चं पोस्टर सलमानकडून रिलीज

सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हरात्री' या सिनेमाची निर्मिती होत आहे

वरिना-आयुषच्या 'लव्हरात्री'चं पोस्टर सलमानकडून रिलीज

मुंबई : 'व्हॅलेंटाईन्स डे'च्या मुहूर्तावर सलमान खानने 'लव्हरात्री' चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवर रिलीज केलं आहे. या सिनेमातून सलमान मेहुणा आयुष शर्माला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे, तर अभिनेत्री वरिना हुसैन त्याच्यासोबत पदार्पण करत आहे.

सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली 'लव्हरात्री' या सिनेमाची निर्मिती होत आहे. लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. 21 सप्टेंबर 2018 रोजी 'लव्हरात्री' प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या 'लव्हरात्री'तून मेहुणा आयुष शर्माचं पदार्पण


या सिनेमाचं दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.


सलमानने गेल्या आठवड्यात एक ट्वीट करुन धमाल उडवून दिली. ‘मुझे लडकी मिल गयी’ या त्याच्या चार शब्दांच्या एका ट्वीटने सोशल मीडियावर चर्चा रंगल्या. अखेर ही मुलगी लव्हरात्रीसाठी मिळालेली हिरोईन असल्याचं समोर आलं.

मुझे लडकी मिल गयी, सलमानचं ट्वीट, फॅन्समध्ये धुरळा


आयुष शर्मासाठी हा मोठा ब्रेक मानला जात आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं 2014 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना अहिल हा मुलगा आहे.

मुलगी मिळाली पण..., सलमान खानचं ट्विटरवरुन स्पष्टीकरण


सलमान खान कायमच स्टारकिड्स किंवा नवोदित अभिनेत्यांना बॉलिवूडमध्ये लाँच करत आला आहे. पुलकित सम्राट, सुरज पांचोली, आथिया शेट्टी, झरीन खान, डेझी शाह, स्नेहा उल्लाल अशी सलमानने लाँच केलेल्या कलाकारांची मोठी यादी आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Salman Khan releases poster of Ayush Sharma Varina Hussain starer Loveratri
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV