दबंग-3 च्या दिग्दर्शनास अरबाजचा नकार, सलमान नव्या दिग्दर्शकाच्या शोधात

By: | Last Updated: > Thursday, 15 June 2017 7:22 PM
दबंग-3 च्या दिग्दर्शनास अरबाजचा नकार, सलमान नव्या दिग्दर्शकाच्या शोधात

मुंबई : दबंग-3 च्या दिग्दर्शनास अरबाज खाननं नकार दिल्याने, सलमान आता नव्या दिग्दर्शकाच्या शोधात आहे. सलमान आणि त्याचा भाऊ सोहेल खान आगामी ट्यूबलाईट सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सलमाननं ही माहिती दिली.

सलमान म्हणाला की, ”आम्ही दगंब-3 लवकरच सुरु करणार आहोत. याविषया त्यांनी (अरबाज)नं मला सांगितलं की, ‘मी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार नाही. केवळ याची निर्मिती करेन.’ यावर मी म्हटलं की, ‘ठिक आहे, आम्ही यासाठी एक चांगला दिग्दर्शक शोधू.”

यानंतर सलमानला त्याच्या आवडत्या दिग्दर्शकाबद्दल विचारले असता, त्यावर तो म्हणाला की, ”अरबाजला दिग्दर्शन करण्यात स्वारस्य नाही. त्यापेक्षा सोहेल उत्तम दिग्दर्शन करु शकतो. कारण त्यासाठी दिग्दर्शकाकडे संयम असणं गरजेचं असतं. सोहेलसोबत काम करताना, तुम्ही चुका सुधारु शकता. पण अरबाजसोबत काम करताना चुकांमुळे तो वैतागतो. आणि त्याचा रक्तदाब वाढतो.”

सिनेमा निवडीविषयी सलमान म्हणाला की, ”जर सिनेमाची पटकथा ऐकत असताना, तुम्ही स्वत: ला पटकथेतील मुख्य नायकाच्या भूमिकेत पाहू शकत नसाल, तर त्याची कथा कितीही चांगली असली, तरी तो सिनेमा करणं व्यर्थ आहे.”

सलमानचा आगामी सिनेमा भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आहे. या सिनेमातील भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्याला विचारले असता, सलमान म्हणाला की, ”आम्ही या सिनेमात भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी दाखवली आहे. या सिनेमातून युद्ध जितक्या लवकर संपवता येईल, तितक्या लवकर संपवणं आवश्यक आहे. हे दाखवण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे. कारण जेव्हा दोन देशात युद्ध होतात, त्यावेळी दोन्ही देशाचे सैनिक मारले जातात. आणि त्यांचे आई-वडील, मुलांना त्यांच्याशिवाय उर्वरित आयुष्य जगावं लागतं.”

सलमानचा ट्यूबलाईट सिनेमा 25 जूनला रिलीज होणार आहे. हा सिनेमा 1962 च्या भारत-चीन लढाईवर आधारित असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या

युद्ध करा म्हणणाऱ्यांच्या हातात बंदुका द्या, सलमानचा राजकारण्यांवर निशाणा

First Published:

Related Stories

हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब
हरियाणाच्या मनुषी छिल्लरला 'फेमिना मिस इंडिया'चा किताब

मुंबई : हरियाणाची मनुषी छिल्लर 2017 ची ‘फेमिना मिस इंडिया’ ठरली आहे.

नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात
नीरजा भानोतचं कुटुंबीय 'नीरजा' चित्रपट निर्मात्यांविरोधात कोर्टात

नवी दिल्ली : दिवंगत एअर हॉस्टेस नीरजा भानोतचे कुटुंबीय राष्ट्रीय

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू
अभिनेता रवी तेजाच्या भावाचा अपघातात मृत्यू

हैदराबाद : तलंगणामध्ये हैदराबादजवळील शम्साबादमध्ये झालेल्या

'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?
'ट्यूबलाईट'ची पहिल्या दिवसाची कमाई किती?

मुंबई: सुपरस्टार सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमाला म्हणावा

ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस
ममता कुलकर्णी फरार घोषित, मुंबईतील घरावर नोटीस

मुंबई : दोन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री ममता

एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड
एक वर्षाने सलमानचं दर्शन, 5 हजार 550 स्क्रीन्सवर ट्युबलाईटचा उजेड

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या भन्नाट यशानंतर आता सलमान खानच्या

रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा
रितेशच्या सिनेमात भूमिकेचं आमिष, ठकसेनाकडून 9 लाखांचा गंडा

नाशिक : सिनेमात काम मिळवून देण्याच्या आमिषानं अनेकांना गंडवणाऱ्या

अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम
अमिताभ यांनी GSTचा प्रचार करु नये: संजय निरुपम

मुंबई: आजपासून बरोबर आठ दिवसांनी प्रत्येकाचं बजेट नक्कीच बदलणार

कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज
कोण शाहरुख? सरफराजच्या लोकप्रियतेवरुन चाहत्याचा माज

मुंबई : पाकिस्तानी संघाने टीम इंडियाचा पराभव करुन चॅम्पियन्स

अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेची कारवाई

मुंबई : मुन्नाभाई सीरिजमधील ‘सर्किट’ या व्यक्तिरेखेमुळे