मुझे लडकी मिल गयी, सलमानचं ट्वीट, फॅन्समध्ये धुरळा

सलमान मॉडेल लुलिया वंतूरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्या खऱ्या मानल्या तरी भाईजान आपल्या लव्ह लाईफबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्याची चिन्हं तशी कमीच.

मुझे लडकी मिल गयी, सलमानचं ट्वीट, फॅन्समध्ये धुरळा

मुंबई : 'मुझे लडकी मिल गयी'.... सलमानने ट्वीट केलेले चार शब्द त्याच्या चाहत्यांमध्ये धुरळा उडवण्यासाठी पुरेसे आहेत. या ट्वीटला ना आगा ना पिछा. त्यामुळे सल्लूमियाच्या फॅन्समध्ये विविध तर्क रंगायला सुरुवात झाली आहे.

बॅचलर सलमान खानने पन्नाशी गाठल्यामुळे त्याला लग्नासाठी मुलगी मिळाली का, असा पहिला प्रश्न साहजिकच चाहत्यांच्या मनात उमटला आहे. सलमान खानच्या अफेअर्सची मालिका पाहता, आता तो कोणत्या मुलीच्या प्रेमात पडला, याची उत्सुकता आहे.

सलमान मॉडेल लुलिया वंतूरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्या खऱ्या मानल्या तरी भाईजान आपल्या लव्ह लाईफबद्दल अशी खुलेआम चर्चा करण्याची चिन्हं तशी कमीच.दुसरीकडे, सलमानने अनेकवेळा मूल दत्तक घेण्याचा विचारही बोलून दाखवला आहे. त्यामुळे सलमानला दत्तक घेण्यासाठी 'लडकी मिल गयी' का, असाही एक प्रश्न निर्माण झाला आहे.

वैयक्तिक आयुष्य सोडलं, आणि सलमानच्या प्रोफेशन आयुष्यात डोकावलं तर त्याच्या आगामी सिनेमासाठी त्याला लडकी मिळाली असावी का, असंही काही जणांना वाटतं. सलमान आता 'भारत' सिनेमातून 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'टायगर जिंदा है' पाठोपाठ या सिनेमातही कतरिना त्याच्यासोबत झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे सलमानला हिरोईन म्हणून लडकी मिळाल्याचीही शक्यता आहे.

Salman Khan Tweet

सलमान खानची बहीण अर्पिताचा पती आयुष 'लव्हरात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली आहे. त्यामुळे या सिनेमाची हिरोईन मिळाल्याचीही शक्यता आहे.

विशेष म्हणजे काही जणांनी सलमानला ट्रोल करायलाही सुरुवात केली आहे. 'लडकी मिली है या आंटी?', 'अगर आप थायलंड में हो तो चेक कर लेना, लडकी नही होगी' असे ट्वीट्स काही जणांनी केले आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Salman Khan tweets that he found a girl, for marriage or film? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV