'ट्यूबलाईट' फ्लॉप, सलमानने वितरकांना 50 टक्के रक्कम परत केली

काही महिन्यांपूर्वी आलेला 'ट्यूबलाईट' सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. यामुळे चित्रपटाच्या वितरकांना मोठं नुकसान झालं होतं.

By: | Last Updated: > Thursday, 10 August 2017 3:46 PM
Salman Khan’s Tubelight flop, decides to give 50 percent back to distributors

मुंबई : “एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी, उसके बाद तो मैं खुद की भी नहीं सुनता,” ‘वॉण्टेड’ सिनेमातील अभिनेता सलमान खानचा हा डायलॉग अतिशय गाजला होता. परंतु रिअल लाईफमध्येही सलमानने त्याची कमिटमेंट पूर्ण केली आहे.

काही महिन्यांपूर्वी आलेला ‘ट्यूबलाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. यामुळे चित्रपटाच्या वितरकांना मोठं नुकसान झालं होतं. मात्र सलमान खानने नुकसानीची 50 टक्के रक्कम वितरकांना परत केले आहेत.

वितरकांच्या टीमचे प्रमुख नरेंद्र हिरावत यांनी ट्यूबलाईट सिनेमा 130 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता. त्यांनी यासंदर्भात सलमान खानची भेट घेतली. सलमानच्या कुटुंबीयांनी मिळून निर्णय घेतला की, वितरकांना 50 टक्के पैसे परत करायचे. याशिवाय वितरकांच्या हितासाठी जे काही करता येईल ते करेन, असंही खान कुटुंबीयांनी ठरवलं आहे.

मुंबईच्या वांद्र्यातील गॅलेक्स अपार्टमेंटमध्ये मागील महिन्यात झालेल्या बैठकीत सलमानचे वडील सलीम खान वितरकांना म्हणाले होते की, “माझ्या मुलाच्या चित्रपटातून तुमचं मोठं नुकसान झालं याची मला कल्पना आहे. आम्ही हे प्रकरण नीट हाताळत आहोत. जे शक्य आहे ते सगळं करु.” मात्र सलमान खान या बैठकीला उपस्थित नव्हता. या बैठकीनंतर वितरक बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, रणबीर कपूरनेही ‘जग्गा जासूस’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान म्हटलं होतं की, जर चित्रपट हिट झाला नाही तरी मी वितरकांचं नुकसान होऊ देणार नाही. आता ‘जग्गा जासूस’ही बॉक्स ऑफिस अपयशी ठरली. त्यामुळे आता रणबीरही सलमानप्रमाणेच पाऊल उचलतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Salman Khan’s Tubelight flop, decides to give 50 percent back to distributors
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या

मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत

मुंबई : ‘बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा’ अशी ख्याती असलेला

अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने

सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे.

बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते