सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाला ईद 2019 चा मुहूर्त

सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने भारत चित्रपटाची निर्मिती केली असून अली अब्बास झफर दिग्दर्शनाची जबाबदारी उचलणार आहे.

सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाला ईद 2019 चा मुहूर्त

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानच्या चित्रपटांची प्रतीक्षा त्याचे चाहते कित्येक महिने आधीपासून करत असतात. बॉक्स ऑफिसवर गर्दी टाळण्यासाठी 2019 मधील ईदचं बुकिंग सलमानने केलं आहे. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा 'भारत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सलमान दरवर्षी ईदला आपले चित्रपट रिलीज करतो. गेल्या ईदला आलेला 'ट्यूबलाईट' फारशी चमकदार कामगिरी बजावू शकला नसला, तरी सलमान आपली परंपरा कायम ठेवणार आहे. सलमानचा मेहुणा अतुल अग्निहोत्रीने भारत चित्रपटाची निर्मिती केली असून अली अब्बास झफर दिग्दर्शनाची जबाबदारी उचलणार आहे.

सलमानने अतुलसोबत केलेल्या बॉडीगार्ड, तर अलीसोबत केलेल्या सुलतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या तिघांनी एकत्र येऊन केलेला भारत चित्रपट चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.

एप्रिल 2018 मध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. अबुधाबी, स्पेन, दिल्ली, पंजाब अशा विविध ठिकाणी शूटिंग होणार तीन महिन्यात कलाकारांची निवड केली जाणार आहे.

'भारत' हा 'ओड टू माय फादर' या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटावर आधारित आहे. निर्मात्यांनी अधिकृतरित्या या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. सामान्य माणसाच्या नजरेतून 1950 पासूनचा आधुनिक कोरियन इतिहास 'ओड टू माय फादर' या सिनेमात मांडला आहे. या चित्रपटालाही युद्धाची पार्श्वभूमी आहे.

भारतपूर्वी अली अब्बास झफरचीच निर्मिती असलेला सलमान-कतरिनाचा 'टायगर जिंदा है' डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV