‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू आता संसदीय बोर्डाच्या कोर्टात गेला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी संसदीय बोर्डाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना बोलावलं आहे. विशेष म्हणजे, संसदीय बोर्डाच्या बैठकीला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

नवी दिल्ली : ‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू आता संसदीय बोर्डाच्या कोर्टात गेला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी संसदीय बोर्डाने दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना बोलावलं आहे. विशेष म्हणजे, संसदीय बोर्डाच्या बैठकीला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी दोन खासदारांनी याचिका दाखल केली आहे. चित्तोडचे भाजप खासदार सी.पी.जोशी आणि कोटाचे भाजप खासदार ओम बिडला यांनी ही याचिका दाखल केली आहे. या दोन्ही खासदारांच्या मागणीवरुन संसदीय बोर्डाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत.

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

दरम्यान, पद्मावती सिनेमात दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप होत आहे. यावरुन संपूर्ण देशभरातील राजपूत समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सिनेमाच्या विरोधात तीव्र विरोध प्रदर्शनं सुरु आहेत. त्यातच आज संसदीय बोर्डाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाला यावर म्हणणं मांडण्यास सांगितलं.

'पद्मावती'चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

दुसरीकडे, या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल याचिका दोन वेळा फेटाळण्यात आल्या आहेत. तसेच या सिनेमाच्या प्रदर्शनाला परदेशातही बंदी घालावी, यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. पण तीही कोर्टाने फेटाळली. शिवाय, कोर्टाने या सिनेमावरुन राजकीय नेत्यांकडून होणाऱ्या टीका-टीप्पणींवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘पद्मावती’च्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या समोर यावर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्तींनी महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींना चांगलंच फटकारलं. “सर्वसमान्य व्यक्तींनी सिनेमावर टीक-टीप्पणी करण्यावर काहीच गैर नाही. पण महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती असे कसे करु शकतात? जर सुप्रीम कोर्टच या सिनेमासंदर्भात विचार करत नाही. तर जबाबदार व्यक्तींनी देखील याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. तुम्ही सेन्सॉर बोर्डाला त्यांचे काम करु द्यावं”

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

दरम्यान, सिनेमातील ज्या दृश्यावरुन वाद निर्माण झाला आहे, ती दृश्याचाच एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन संजय लीला भन्साळींनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सिनेमात पद्मावती आणि खिलजीमध्ये कोणतेही ड्रीम सिक्वेंस नाहीत. तसेच या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या दोघांनीही एकत्रित शूटिंग केलेलं नाही.”

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

पद्मावती सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण चोहूबाजूंनी या सिनेमाला विरोध आणि सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. सिनेमा निर्मात्यांनीही रिलीजची तारीख लवकरच जाहीर करु, असं जाहीर केलं आहे.

संबंधित बातम्या

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sanjay leela bhansali calls parliamentary panel meeting in new delhi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV