अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

‘पद्मावत’ सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी ट्विटरवर नवीन पोस्टर शेअर केला.

अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

मुंबई : वादात सापडलेल्या ‘पद्मावत’ सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सिनेमाचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांनी ट्विटरवर नवीन पोस्टर शेअर केला. या पोस्टरवर कुठल्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीचा फोटो टाकण्यात आलेला नाही.

पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीपासूनच हा सिनेमा वादग्रस्त ठरला होता. सुरुवातीला करणी सेनेनं केलेला विरोध, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाची नाराजी, अशा विविध घटनांमुळे सिनेमा कात्रीत सापडला होता. सिनेमाच्या वादामुळे निर्मात्यांना याची प्रदर्शनाची तारीख ही पुढे ढकलावी लागली होती.

अखेर सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले बदल केल्यानंतर या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. आता हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याच धर्तीवर दिग्दर्शक संजय लिला भन्साळीने ट्विटरवर नवं पोस्टर रिलीज केलं आहे.

दरम्यान, राजस्थानमध्ये मात्र हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया यांनी म्हटलं. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनावेळीही पुन्हा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे सिनेमाला करणी सेनेचाही विरोध कायम आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देऊन सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केल्यानंतर, करणी सेनेने आक्रमक पवित्रा घेत, सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शनही केली होती. यावेळी पोलिसांनी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं होतं. त्यामुळे सिनेमा प्रदर्शनानंतही पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल

'पद्मावत'ला विरोध करणारे करणी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

'पद्मावती'च्या नावातून आधी 'i' काढला, आता 'हे' अक्षर अॅड

'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार

प्रजासत्ताक दिनी ‘पॅडमॅन’ विरुद्ध ‘पद्मावती’ टक्कर

'पद्मावती'चं नाव बदलण्याची शक्यता, नवं नाव...

'पद्मावती'चं भविष्य इतिहासतज्ज्ञांच्या हाती, मार्चमध्ये रिलीज?

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sanjay leela bhansali shares padmavats news poster through twitter
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV