'पद्मावत'लाही पायरसीची कीड, संपूर्ण सिनेमा फेसबुकवर लीक

या लाईव्ह व्हिडिओला साडेतीन लाख व्ह्यूज मिळाले असून तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी तो शेअर केला होता.

'पद्मावत'लाही पायरसीची कीड, संपूर्ण सिनेमा फेसबुकवर लीक

मुंबई : कुठलाही चित्रपट ही त्याच्या दिग्दर्शकापासून स्पॉटबॉयपर्यंत अनेक कलाकार-तंत्रज्ञांच्या कष्टाचं फळ असतं. टीम भन्साळींच्या मेहनतीतून साकारलेल्या 'पद्मावत' चित्रपटाला चांगल्या-वाईट प्रतिसादाचं फळ मिळण्यापूर्वीच पायरसीची कीड लागली आहे. संपूर्ण सिनेमा फेसबुकवर लीक करण्यात आला आहे.

'पद्मावत' चित्रपट गुरुवारी, 25 जानेवारीला प्रदर्शित झाला, तर बुधवारी 24 तारखेला सिनेमाचा पेड प्रीव्ह्यू दाखवण्यात आला. 'जाटों का अड्डा' या फेसबुक पेजवरुन हा सिनेमा थिएटरमधून लाईव्ह व्हिडिओद्वारे लीक करण्यात आला.  या लाईव्ह व्हिडिओला साडेतीन लाख व्ह्यूज मिळाले असून तब्बल 15 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी तो शेअर केला होता.

रिव्ह्यू: भव्य, रेखीव, नेत्रदीपक - पद्मावत


पद्मावतमध्ये दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर रझा मुराद, जिम सर्भ, अदिती राव हैदरी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी अल्लाउद्दीन खिल्जी साकारणाऱ्या रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

सिनेमा ऑनलाईन लीक करणाऱ्या व्यक्तींवर आयटी अॅक्ट, कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत कारवाई होऊ शकते, अशी माहिती सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षातज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी दिली आहे. इतकंच नव्हे, तर लीक झालेला व्हिडिओ शेअर करणाऱ्यांनाही तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपये दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे आता अतिउत्साही नेटकऱ्यांचं धाबं दणाणलं आहे.

पद्मावती ते पद्मावत

राजपूत करणी सेनेने देशभर विरोध केल्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. चित्रपटाचं नाव बदलून 'पद्मावत' आणि काही दृश्यांत बदल केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने यू/ए सर्टिफिकेट दिलं. 'Padmavati' पासून सुरु झालेला या टायटलचा प्रवास व्हाया 'Padmavat' आता 'Padmaavat' वर पोहचला.

पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट हवं असल्याचं त्याचं नामकरण 'पद्मावत' करावं अशी सूचना केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळातर्फे देण्यात आली होती. हा चित्रपट ऐतिहासिक नसून, पद्मावत ही काल्पनिक कलाकृती या चित्रपटाच्या सर्जनशीलतेचा स्रोत असल्याचं दिग्दर्शकाने म्हटलं आहे. म्हणून भन्साळींना सिनेमाचं नावही पद्मावत ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले होते.

सतीच्या परंपरेचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही, असंही डिस्क्लेमर देण्यास दिग्दर्शकाला सांगण्यात आलं होतं.

पद्मावतचा वाद

करणी सेना आणि काही राजकीय पक्षांनी विरोध केल्याने 'पद्मावती' संदर्भात वाद निर्माण झाला होता. राजपुतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे.

हा सिनेमा अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्याचं सिनेकर्त्यांनी सांगितल्यामुळे केंद्रीय चित्रपट निरीक्षक मंडळाने इतिहासतज्ज्ञ आणि राजघराण्यातील काही व्यक्तींना पद्मावती पाहण्यासाठी सहा सदस्यीय समितीला निमंत्रित केलं होतं. निर्मात्यांनी 'पद्मावती अंशतः ऐतिहासिक घटनांवर आधारित' असल्याचं सांगून संकट ओढावून घेतल्याचं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं होतं.

'पद्मावती काल्पनिक आहे की ऐतिहासिक घटनांवर आधारित' यासंबंधी विचारणा करणारा फॉर्ममधील भाग रिकामा ठेवल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने सिनेमाची कॉपी निर्मात्यांना परत पाठवली होती.

घूमरचं नवं व्हर्जन

दीपिकाच्या ‘घूमर’ गाण्याचंही नवं व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय यूट्यूबवरुनही जुनं गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.

चार राज्यांचा विरोध

राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा या चार राज्यांनी सिनेमाच्या रीलिजवर बंदी घातली. याविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यावर कोर्टाने ही बंदी अवैध असल्याचं सांगितलं. 'पद्मावत' प्रदर्शित झाल्यावर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

'पद्मावती' 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी महिनाभर आधी हे रिलीज अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं. अखेर 25 जानेवारी 2018 रोजी हा चित्रपट 'पद्मावत' नावाने प्रदर्शित झाला.

दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत

राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरी, रझा मुराद, जिम सर्भही या चित्रपटात झळकले आहेत.

रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
संबंधित बातम्या

कोणत्याही ‘कट’शिवाय ‘पद्मावत’ला पाकिस्तानात परवानगी

राजा रावल रतन सिंहसाठी शाहरुखने किती मानधन मागितलं?

कुठे 2400 तर कुठे 1500 रुपये तिकीट, विरोध झुगारुन 'पद्मावत'ला गर्दी

या’ चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित करणार नाही : मल्टिप्लेक्स असोसिएशन

‘पद्मावत’ शाहिद कपूरसाठी ‘गेम चेंजर’?

'पद्मावत' सिनेमाच्या पाठिंब्यावरुन मनसेमध्ये फूट

'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध चुकीचा, मनसेचा पाठिंबा

‘पद्मावत’च्या रिलीजआधी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी

'पद्मावत' देशभरात रिलीज होणार!

'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध कायम, 25 जानेवारीला 'भारत बंद'ची हाक

'घूमर' गाणं नव्याने रिलीज, दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन

'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी

'पद्मावत'च्या निर्मात्यांना दिलासा, सर्व राज्यात प्रदर्शित होणार!

चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात

केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड

‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर

अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज

'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल

'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार

म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

 

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sanjay Leela Bhansali’s Padmaavat leaked online, Facebook page live streams full movie latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV