'गोलमाल अगेन'ने पहिल्याच दिवशी या वर्षातले सर्व विक्रम मोडले!

बॉलिवूडमध्ये या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ (21.15 कोटी) आहे.

'गोलमाल अगेन'ने पहिल्याच दिवशी या वर्षातले सर्व विक्रम मोडले!

मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजचा चौथा सिनेमा गोलमान अगेन रिलीज झाला आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 30.14 कोटींची कमाई केली. या वर्षात एवढी कमाई करणारा बॉलिवूडचा हा पहिलाच सिनेमा आहे.

या वर्षात सर्वाधिक ओपनिंगचा विक्रम ‘बाहुबली 2’ च्या नावावर आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 41 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर बॉलिवूडमध्ये या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ (21.15 कोटी) आहे.

‘’गोलमाल अगेन’ची टक्कर आमिर खानच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’शी आहे. मात्र ‘गोलमान अगेन’ने या सिनेमावर मात केली आहे. 19 ऑक्टोबर रोजी रिलीज झालेल्या आमिरच्या सिनेमाने पहिल्या दिवशी केवळ 4.80 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. तर 20 ऑक्टोबरला रिलीज झालेल्या ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.

अजय देवगण, तुषार कपूर, तब्बू, अरशद वारसी, जॉनी लीवर, श्रेयस तळपदे, कुणाल खेमू आणि परिणीती चोप्रा यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

दरम्यान अजय देवगण आणि रोहित शेट्टी या जोडिचा सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा हा दुसरा सिनेमा आहे. ‘सिंघम रिटर्न्स’ने पहिल्याच दिवशी 32.09 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. तर ‘गोलमाल अगेन’ने 30.14 कोटींचा गल्ला जमवला.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV