मराठी चित्रपटांची गर्दी, एकाच दिवशी 7 सिनेमे प्रदर्शित

बॉक्स ऑफिसवर आज मराठी चित्रपटांची गर्दी होत आहे. कारण आज एक दोन नव्हे तर तब्बल 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

By: | Last Updated: > Friday, 6 October 2017 11:36 AM
seven marathi movie release today latest update

मुंबई : बॉक्स ऑफिसवर आज मराठी चित्रपटांची गर्दी होत आहे. कारण आज एक दोन नव्हे तर तब्बल 7 मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

यामध्ये सुवर्णकमळ विजेता ‘कासव’, शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘हलाल’, आणि नागराज मंजुळेंची भूमिका असलेला ‘द सायलेंन्स’ या तीन सिनेमांचाही समावेश आहे.

सुवर्णकमळ विजेता ‘कासव’ चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे. सुनिल सुकथनकर आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित कासव चित्रपट 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कष्ट मराठी चित्रपट ठरला होता.

एकीकडे बॉलिवूडमध्ये एकाच दिवशी सिनेमे रिलीज करणं प्रकर्षाने टाळलं जातं. त्यासाठी कट्टर शत्रूशीही संवाद साधला जातो. मात्र मराठी सिनेमांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही. एकाचवेळी सात सिनेमे रिलीज झाल्याने नफ्याचं प्रमाण निश्चितच विभागलं जाणार.

दुसरीकडे हे सिनेमे एकाच वेळी प्रदर्शित करण्याची वेळ का आली, याबाबतीतही वेगवेगळी कारणं दिली जात आहेत.

द सायलेन्स

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित आणि सत्य कथेवर आधारित असणारा ‘द साय़लेंन्स’ या चित्रपटात नागराज मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाची पटकथा अनिता सिधवानीने लिहिली असून मुंबई, पुण्यासोबतच जर्मनी, अमेरिकेसारखे देश आणि 35 हुन अधिक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्र राज्याच्या 2 राज्य पुरस्कारांसोबतच एकूण 15 पुरस्कारांवर सायलेंन्सने आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे.

हलाल

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून गौरविला गेलेला ‘हलाल’ हा चित्रपटही सिने रसिकांच्या भेटीला येतो आहे. राजन खान लिखित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हा सिनेमा मुस्लीम धर्मातील विवाह संस्थेवर भाष्य करतो.

आज प्रदर्शित होणारे मराठी सिनेमे

  • आदेश: पॉवर अॉफ लॉ
  • निर्भया
  • भविष्याची एेशी तैशी
  • लादेन आला रे !
  • द सायलेन्स
  • हलाल
  • कासव

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:seven marathi movie release today latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार
काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार

मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या मुलाची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश
दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीनं दिवाळीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक

ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप
ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप

मुंबई : ट्विटरवर बॉम्ब फोडणारा अभिनेता कमाल खानलाच ट्विटरने दिवाळी

'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर
'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा
'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी