आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

एका स्त्रीबद्दल अशी भाषा वापरली जाते, हे अशोभनीय असल्याचं मत शाहीद कपूरने व्यक्त केलं.

आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, शाहीदचा संताप

मुंबई : आधी 'पद्मावती' चित्रपट बघा, मग बोला, असं आवाहन राजा रतन सिंगची भूमिका साकारणारा अभिनेता शाहीद कपूरने केलं आहे. 'पद्मावती' साकारणारी अभिनेत्री दीपिका पदुकोनचा शिरच्छेद करण्याबाबत मिळणाऱ्या धमक्यांविषयीही शाहीद कपूरने संताप व्यक्त केला.

‘पद्मावती’चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

'फिल्मफेअर स्टाईल अॅन्ड ग्लॅमर अवॉर्ड्स'च्या वेळी शाहीदने चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबद्दल नाराजी व्यक्त केली. एका स्त्रीबद्दल अशी भाषा वापरली जाते, हे अशोभनीय असल्याचं मतही शाहीदने व्यक्त केलं. राणी पद्मावतीची प्रतिमा मलीन केल्याचा दावा करत करणी सेनेसह राजपूत संघटनांनी सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला आहे.

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात


पद्मावती चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र अनिश्चित काळासाठी हे रीलिज पुढे ढकलण्यात आलं आहे. सीबीएफसीकडून अद्याप सिनेमाला सेन्सॉर सर्टिफिकेट मिळालेलं नाही. बॉक्स ऑफिसवर याचा चांगला परिणाम होईल, की वाईट हे माहित नाही, असंही शाहीद म्हणाला.

‘पद्मावती’ चित्रपटाचं रीलिज लांबणीवर, निर्मात्यांची घोषणा

'माझ्या मते पद्मावती हा चांगला चित्रपट आहे. त्यामुळे चांगलं कथानक असलेल्या इतर चित्रपटांना जसा प्रतिसाद मिळतो, तशीच प्रतिक्रिया हा सिनेमा जेव्हा कधी रीलिज होईल, तेव्हा मिळेल अशी अपेक्षा आहे.' असं शाहीदला वाटतं.

‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन

या अवॉर्ड शोला रेखा, ह्रतिक रोशन, कतरिना कैफ, करीना कपूर, श्रीदेवी, आलिया भट, सोनम कपूर अशा अनेक तारे-तारकांनी हजेरी लावली होती. सोनम कपूर, हुमा कुरेशी, शाहीद कपूर, आयुषमान खुराणा रेड कार्पेटवर उतरले होते.

… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात

ह्रतिक रोशन, यामी गौतम, सोनाक्षी सिन्हा, कृती सॅनन यांनीही पद्मावती चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

संबंधित बातम्या

‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज

सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर

एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज

दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज

रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा

रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shahid Kapoor reacts on threats given to Deepika Padukone over Padmavati issue latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV