हृतिकला मागे टाकून शाहिद 'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017'

या जगभरातील चाहत्यांनी दिलेल्या मतांच्या आधारावर दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते.

हृतिकला मागे टाकून शाहिद 'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ब्रिटनच्या 'ईस्टर्न आय' या साप्ताहिकाच्या वार्षिक पोलमध्ये शाहिद कपूरची 'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017' अर्थात 'सर्वात सेक्सी आशियायी पुरुष 2017' म्हणून निवड झाली आहे.

या जगभरातील चाहत्यांनी दिलेल्या मतांच्या आधारावर दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते.

'उडता पंजाब' सिनेमात आपल्या दमदार अभिनयासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या 36 वर्षी शाहिदने, या पोलमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि ब्रिटीश-पाकिस्तानी गायक जायन मलिकला मागे टाकलं आहे.

या पोलमध्ये हृतिक रोशन सलग तीन वर्ष दुसऱ्या स्थानावर आहे. तर मागील वर्षाचा विजेता जायनची यंदा मात्र तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

https://twitter.com/EasternEye/status/940935863344779264

शाहिद कपूरची प्रतिक्रिया
"मला मत देणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. सर्वात सेक्सी आशियायी पुरुष हा टॅग मिळणं हा माझा सन्मान असल्याचं मी मानतो, अशी प्रतिक्रिया शाहिद कपूरने 'ईस्टर्न आय'ला दिली."

https://twitter.com/shahidkapoor/status/940940209029513216
"सेक्सीचा अर्थ केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर हे आयुष्याच्या मानसिक पैलुंशीही संबंधित आहे. तुमच्या प्रेम आणि समर्थनामुळेच हे शक्य झालं," असंही शाहिद म्हणाला.

दरम्यान, वादामुळे शाहिद कपूरचा 'पद्मावती' सिनेमा अद्याप प्रदर्शित झालेला नाही.

प्रियांका चोप्रा 'सर्वात सेक्सी आशियायी महिला 2017'
काही दिवसांपूर्वीच 'ईस्टर्न आय'ने यंदाच्या 'सर्वात सेक्सी आशियायी महिला'चा पोलही घेतला होता. या पोलमध्ये दीपिका पादूकोणला मागे टाकत प्रियांका चोप्राने अव्वल स्थान पटकावलं होतं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shahid Kapoor voted the ‘Sexiest Asian Man’ by in UK poll
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV