शाहरुख खानला हॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शाहरुख खानला ‘क्रिस्टल अवॉर्ड’ने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार शाहरुखला प्रदान केल्यानंतर, त्याने केंट ब्लँचेट आणि एल्टन जॉन यांना त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली.

शाहरुख खानला हॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर

दावोस/ स्वित्झर्लंड : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्यासोबतच्या एका सेल्फीसाठी लाखो तरुण-तरुणी आसूसलेले असतात. पण याच किंग खानला एका कार्यक्रमात हॉलिवूड कलाकरांसोबत सेल्फी घेण्याचा मोह अनावर झाला.

स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये शाहरुख खानला ‘क्रिस्टल अवॉर्ड’ने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाला हॉलिवूड कलाकार केट ब्लॅंचेट आणि प्रसिद्ध गायक एल्टन जॉन हे दोघेही उपस्थित होते. ‘क्रिस्टल’ पुरस्कार शाहरुखला प्रदान केल्यानंतर, त्याने केंट ब्लँचेट आणि एल्टन जॉन यांना त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली.

यावेळी त्याने दोघांच्याही कामाची मुक्तकंठाने स्तुती केली. या दोघांबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, “केंट ब्लँचेट आणि एल्टन जॉन यांच्या सहवासात राहणं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. केंट या अशा महिला अभिनेत्री आहेत, ज्या वाऱ्याची दिशा निश्चित करु शकतात. तर एल्टन यांनी आपल्या आवाजाने माझ्यासह अनेकांना मंत्रमुग्ध केलं आहे.”दरम्यान, शाहरुखची मीर फाऊंडेशन भारतातील अनेक लहान मुलं आणि महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. या संस्थेच्या कामाची दखल घेऊन, शाहरुखला क्रिस्टल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: shahrukh khan has his fan moment in world economic forum summit
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV