अमरनाथ हल्ल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया

By: | Last Updated: 11 Jul 2017 06:56 PM
अमरनाथ हल्ल्यावर शाहरुख खानची प्रतिक्रिया

मुंबई: अमरनाथ यात्रेतील भाविकांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्लावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. यावेळी बॉलिवूडकरांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय.

अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ बॉलिवूडचा किंग शाहरुखनं देखील ट्विटरवरुन या घटनेचा निषेध केला. 'निर्दोष लोकांच्या मृत्यूनं मी दु:खी झालो आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच देवाचरणी प्रार्थना.'दरम्यान या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनंही दु:ख व्यक्त केलं आहे. 'अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदनीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे', असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 12 भाविक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला होता.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV