नावासारखाच सरळमार्गी विनोदवीर: शरद तळवलकर!

मराठी प्रेक्षकांना खळाळून हसवणाऱ्या शरद तळवलकर यांची आज 99 वी जयंती.

SHARAD TALKWALKAR Notable comic actor in Marathi films, special report by sachin patil

मुंबई: कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पांचट विनोद करुन, कृत्रिम हास्य फुलवण्याचा प्रयत्न, सध्या आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतो. मराठी असो वा हिंदी मनोरंजन वाहिनी, एक तरी कॉमेडी शो असतोच असतो.

मात्र कॉमेडीच्या दुनियेत एक बादशाह असा होऊन गेला, ज्याचा केवळ चेहरा समोर आला तरी आपोआप हसू येत असे. त्याने डायलॉग मारला की हसून हसून पोट धरावं लागे. ना त्याच्या डायलॉगमध्ये कृत्रिमपणा होता, ना ओढून ताणून जुळवलेले शब्द. तो होता खराखुरा विनोदवीर शरद तळवलकर.

मराठी प्रेक्षकांना खळाळून हसवणाऱ्या शरद तळवलकर यांची आज 99 वी जयंती. नगर जिल्ह्यातील बोधेगावात जन्मलेल्या शरद तळवलकरांनी, मराठी चित्रपटसृष्टीवर हस्याची लकेर उमटवली.

Sharad Talwalkar 2

महेश कोठारेंच्या धुमधडाका या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि स्वत: महेश कोठारे हे तीनही एक्के होते, मात्र हुकमाचा एक्का म्हणून शरद तळवलकर यांचंच नाव घ्यावं लागेल. या सिनेमात त्यांनी भूषवलेली धनाजी वाकडेंची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

या सिनेमाचं कथानक धनाजी वाकडेंभोवतीच फिरतं, त्याचमुळे शरदरावांना या सिनेमाचा हुकमी एक्का म्हणावं लागेल.

साधा- सरळ, सुशील आणि एकमार्गी शरद तळवलकर हे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळेच विनोदाचा महामेरु असलेल्या पु ल देशपांडेंनीही, शरद तळवलकर हे नावाप्रमाणेच सरळ असल्याचं म्हटलं होतं.

करिअरची सुरुवात

शरद तळवलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1918 रोजी नगर जिल्ह्यातील बोधेगावात झाला. त्यांचं शालेय जीवन पुण्यात गेलं. त्यांनी भावे स्कूलमध्ये रणदुदुंभी नाटकात शिशूपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकात भद्रायू भाटकर ही पात्र रंगवली.

इथेच शरद तळवलकर नावाचा अभिनेता नाट्य आणि सिनेसृष्टीला मिळाला. मुख्य कलावंतांच्या गैरहजेरीमुळे अनेकवेळा पर्याय म्हणून शरद तळवलकर यांना संधी मिळाली. या संधीचं सोनं आणि पुढे त्याचं खणखणीत नाणं कसं करायचं हे शरद तळवलकर यांनी दाखवून दिलं.

पुढे तळवलकरांनी केशवराव दात्येंच्या ‘नाट्यविकास’ मंडळात नोकरी केली. ‘छापील संसार’ हे त्यांच्या वाट्याला आलेलं पहिलं व्यावसायिक नाटक त्यांनी गाजवलं.

मग त्यांनी माझा मुलगा या सिनेमात विनोदी अभिनेता म्हणून भूमिका केली आणि ती प्रचंड गाजली.

Sharad Talwalkar 1

तळवलकरांनी ‘एकच प्याला’मध्ये तळीरामाची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी चक्क नटश्रेष्ठ बालगंधर्वांनी त्यांना शाबासकीची थाप दिली.

त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्य निर्मातेपदाची धुरा वाहिली. त्यांच्या काळातील नभोनाट्याला श्रोत्यांनी डोक्यावर घेतलं.

या साधूने आपल्या कामाप्रतीची ध्यानसाधना आयुष्याच्या अखेरपर्यंत सुरु ठेवली. अखेर 21 ऑगस्ट 2001 रोजी शरद तळवलकर यांचे तुफानी विनोद कायमचे शांत झाले.

 शरद तळवलकर यांचे गाजलेले नाटक- सिनेमे

 • लाखाची गोष्ट
 • पेडगावचे शहाणे
 • तुळस तुझ्या अंगणी
 • रंगल्या रात्री
 • अखेर जमलं
 • वाट चुकलेले नवरे
 • बायको माहेरी जाते
 • मुंबईचा जावई
 • एकटी
 • जावई विकत घेणे
 • भावबंधन
 • अपराध मीच केला
 • गुप्तेकाका
 • दिवा जळू दे
 • सखी शेजारीण
 • अष्टविनायक
 • गडबड घोटाळा
 • गौराचा नवरा
 • धाकटी सून
 • धूमधडाका
 • नवरे सगळे गाढव
 • मामा भाचे
 • मुंबईचा जावई
 • राणीने डाव जिंकला
 • वरदक्षिणा

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:SHARAD TALKWALKAR Notable comic actor in Marathi films, special report by sachin patil
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मध्य प्रदेशात पद्मावती रिलीज होणार नाही : शिवराज सिंह
मध्य प्रदेशात पद्मावती रिलीज होणार नाही : शिवराज सिंह

भोपाळ : पद्मावती सिनेमाला अगोदर राजपूत करणी सेनेचा विरोध होता.

'पद्मावती'च्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
'पद्मावती'च्या प्रदर्शनात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : पद्मावती सिनेमाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका

अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती विवाहबंधनात
अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती विवाहबंधनात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती यादव

बॉलिवूडमधील 'या' सेलिब्रेटीच्या सल्ल्याने तुषार कपूर सिंगल पेरेंट
बॉलिवूडमधील 'या' सेलिब्रेटीच्या सल्ल्याने तुषार कपूर सिंगल पेरेंट

मुंबई : सिंगल पेरेंट झालेला तुषार कपूर हा बॉलिवूडमधला पहिला अभिनेता

प्रजासत्ताक दिनी अक्षयच्या 'पॅडमॅन'ची नीरज पांडेशी टक्कर
प्रजासत्ताक दिनी अक्षयच्या 'पॅडमॅन'ची नीरज पांडेशी टक्कर

मुंबई : अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ येत्या प्रजासत्ताक दिनाला

प्रियांकाला अर्ध्या तासासाठी 12 कोटी, दीपिकाला पूर्ण सिनेमासाठी 8 कोटी!
प्रियांकाला अर्ध्या तासासाठी 12 कोटी, दीपिकाला पूर्ण सिनेमासाठी 8...

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अमेरिकन

व्हायरल सत्य : वर्दीतील 'ही' महिला बठिंडा पोलिस स्टेशनची एसएचओ?
व्हायरल सत्य : वर्दीतील 'ही' महिला बठिंडा पोलिस स्टेशनची एसएचओ?

मुंबई : सोशल मीडियावर सध्या ह्या महिला पोलिसाचे फोटो व्हायरल होत

दिलदार प्रभास, तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना 75 लाखांची मदत
दिलदार प्रभास, तामिळनाडूच्या शेतकऱ्यांना 75 लाखांची मदत

मुंबई : बाहुबली चित्रपटात अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली यांचा

वादग्रस्त 'पद्मावती'चा आज सुप्रीम कोर्टात फैसला
वादग्रस्त 'पद्मावती'चा आज सुप्रीम कोर्टात फैसला

नवी दिल्ली : अनेकांच्या विरोधाला बळी पडलेल्या पद्मावतीचा फैसला आज

मी रणवीरला डेट करणार : दीपिका पदुकोण
मी रणवीरला डेट करणार : दीपिका पदुकोण

मुंबई : दीपिका पदुकोणचा ‘पद्मावती’ सिनेमा सध्या वादाच्या