VIDEO: 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर रिलीज, अशोक सराफ प्रमुख भूमिकेत

VIDEO: 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर रिलीज, अशोक सराफ प्रमुख भूमिकेत

मुंबई: पोश्टर बॉईज, पोश्टर गर्ल यासारख्या धमकेदार सिनेमांनंतर आता दिग्दर्शक समीर पाटील यांचा नवा सिनेमा 'शेंटिमेंटल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. अशोक सराफ हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

पोश्टर बॉईज आणि पोश्टर गर्ल या सिनेमातून समीर पाटील यांनी खास आपल्या शैलीत सामजिक विषयावर भाष्य केलं होतं. त्यामुळे शेंटिमेंटल हा सिनेमा नेमका कोणत्या विषयावर बेतलेला असणार याबाबत प्रेक्षकांना बरीच उत्सुकता आहे.

'करप्ट अधिकारी आणि अट्टल गुन्हेगार मी एका नजरेत ओळखतो.' अशी संवाद फेक करणारे अशोक सराफ हे या सिनेमात एका पोलीस हवालदाराची भूमिका साकारत आहेत.

दरम्यान काहीच दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आणि पोस्टरही लाँच करण्यात आलं होतं. 28 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा 'शेंटिमेंटल'चा ट्रेलर

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV