मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त : शिल्पा शिंदे

‘बिग बॉस’च्या घरात असलेली ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त : शिल्पा शिंदे

मुंबई: मराठी-अमराठीवरुन राजकारण तापलं असतानाच, टीव्ही विश्वातही मराठी कलाकारांच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम, दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर मराठी कलाकारने केलं आहे.

‘बिग बॉस’च्या घरात असलेली ‘भाभीजी घरपर है’ फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

“मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा...... असं त्यांचं वागणं असतं... मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है”, असं शिल्पा शिंदे म्हणाली.

https://twitter.com/BiggBoss11News1/status/936184071666860032

बिग बॉसच्या घरात विकास गुप्तासोबत मराठी कलाकारांविषयी बोलत असताना शिल्पानं हे वक्तव्य केलं. त्यामुळे आता मराठी कलाकार मंडळी शिल्पाच्या या टीकेवर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

एकीकडे शिल्पाने मराठी कलाकारांच्या वर्मावर बोट ठेवलं असलं, तरी तिने उत्तम कलाकारांचं तोंडभरुन कौतुकही केलं.

विक्रम गोखले, मोहन गोखले, स्मिता जयकर यांचं तिने कौतुक केलं.

शिल्पा म्हणाली, “विक्रम गोखले यांनी नटसम्राट सिनेमात केलेलं काम पाहताना मला अश्रू अनावर होत होते. ते अभिनय करत आहेत हे माहित असूनही आम्हाला रडू येत होतं, यावरुन ते किती महान कलाकार आहेत याची प्रचिती येते”

स्मिता जयकर या खूपच संवेदनशील अभिनेत्री आहेत, तर मोहन गोखले यांनी जो अभिनय केला, ते ते त्यांच्या आयुष्यात घडत गेलं, असं शिल्पा शिंदे म्हणाली.


http://polldaddy.com/poll/9888226/

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Shilpa Shinde talks about the Marathi Actors and People
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV