श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते आज मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-2018 च्या सांगता सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

श्याम बेनेगल यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर

 

मुंबई : प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक श्याम बेनेगल यांना यंदाचा व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना राज्यपाल सी.विद्यासागरराव यांच्या हस्ते आज मुंबई आंतराष्ट्रीय फिल्म महोत्सव-2018 च्या सांगता सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. यात किरण शांताराम, राहुल रावल, प्रसून जोशी, भारती प्रधान आणि विनोद अनुपम यांचा सहभाग होता. समितीने श्याम बेनेगल यांच्या भारतीय सिनेसृष्टीतील कार्याची दखल घेऊन, त्यांना हा पुरस्कार जाहीर केला.

श्याम बेनेगल यांनी आपल्या कारकीर्दीत 28 सिनेमांचे दिग्दर्शन केले. यात अंकुर, निशांत, मंडी, भूमिका, मंथन आणि जुनूनसारख्या सिनेमांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी 41 माहितीपटांचीही निर्मिती केली.

बेनेगल यांना त्यांच्या ‘अरोहन’ (1982) या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने  गौरवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे, त्यांना सिनेमे आणि माहितीपटांसाठी तब्बल नऊवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. 2005 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. त्याशिवाय, त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: shyam benegal named for v shantaram-lifetime-achievement-award
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV