सहकाऱ्यांच्या प्रतापानं सनी लिओनीची घाबरगुंडी

बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनी शूटिंगसाठी सेटवर असताना तिच्या टीमनं तिच्यासोबत केलेल्या प्रँकचा व्हिडीओ शेअर केला. यात सनी लिओनी स्क्रिप्ट वाचत असताना तिच्या टीममधल्या एका सदस्यानं साप आणून तो सनीच्या अंगावर टाकला. यानंतर सनीची मोठी घाबरगुंडी उडाली.

By: | Last Updated: 26 Nov 2017 07:57 PM
सहकाऱ्यांच्या प्रतापानं सनी लिओनीची घाबरगुंडी

मुंबई : बॉलिवूडची सर्वात हॉट अभिनेत्री सनी लिओनी शूटिंगसाठी सेटवर असताना तिच्या टीमनं तिच्यासोबत केलेल्या प्रँकचा व्हिडीओ शेअर केला. यात सनी लिओनी स्क्रिप्ट वाचत असताना तिच्या टीममधल्या एका सदस्यानं साप आणून तो सनीच्या अंगावर टाकला. यानंतर सनीची मोठी घाबरगुंडी उडाली.

साप अंगावर पडताच सनी इतकी भेदरली की, ती त्याच्या मागे धावली. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ खुद्द सनी लिओनीनं तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर टाकलाय आणि आपल्या टीमनं आपला प्रँक केल्याचं कॅप्शनही दिलं आहे.

या व्हिडीओत सनी एका खुर्चीत बसून सिनेमाची स्क्रिप्ट वाचत होती. याच वेळी तिच्या एका सहकाऱ्यानं तिच्या खांद्यावर साप टाकला. हा साप पाहून सनी लिओनीचे फे फे उडाले. हातातले पेपर टाकून ती सैरावैरा धावत सुटली.My team played a prank on me on set!! @sunnyrajani @tomasmoucka mofos!!!!!!


A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सध्या सनी लिओनी आपल्या आगामी तेरा इंतजार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती अरबाज खानसोबत दिसणार आहे. सनीचा हा सिनेमा येत्या 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

दरम्यान, सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सिनेमातील नुकतच रिलीज झालेलं बार्बी या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आहे. या गाण्यातील बार्बी हा शब्द मॅटल इंक ट्रेडमार्क बार्बी डॉल असल्याचा कंपनीचा दावा आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: snake-dragging-over-ear-and-shoulder-prank-make-sunny-leone-very-scared
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV