राम जेठमलानींवर सिनेमा, सोहा निर्माती, तर मुख्य भूमिकेत...

कुणाल खेमूच्या प्रॉडक्शन कंपनीचा हा पहिलाच सिनेमा असून रॉनी स्क्रूवाला यांची सहनिर्मिती आहे.

राम जेठमलानींवर सिनेमा, सोहा निर्माती, तर मुख्य भूमिकेत...

मुंबई : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या आयुष्यावर लवकरच एक चित्रपट येत आहे. अभिनेत्री सोहा अली खानने पती कुणाल खेमू सोबत या सिनेमाची निर्मिती करत असून कुणाल खेमूच जेठमलानींच्या भूमिकेत आहे.

'राम जेठमलानी यांचं आयुष्य विस्मयकारक आहे. त्यांची कारकीर्द 70 वर्षांची आहे. राजकीय नेत्यांपासून कुख्यात गुन्हेगारांपर्यंत अनेकांच्या केसेस त्यांनी लढवल्या आहेत. त्यांची कथा सांगणं हे कठीण काम नाही, तर कुठला भाग वगळावा, हे निवडणं कठीण आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उत्कंठावर्धक आहे' असं सोहा म्हणते.

कुणाल खेमूच्या प्रॉडक्शन कंपनीचा हा पहिलाच सिनेमा असून रॉनी स्क्रूवाला यांची सहनिर्मिती आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरु आहे. त्यानंतर दिग्दर्शकाची निवड करण्यात येईल. 2018 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Kunal Kemmu Ram Jethmalani

राम जेठमलानी 94 वर्षांचे आहेत. 70 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या आहेत. 1959 मधील केएम नानावटी केस, 2011 चा टूजी घोटाळा, हवाला घोटाळ्यात अडवाणींची बाजू लढवणं असो वा अरुण जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्या अरविंद केजरीवालांची केस घेणं, जेठमलानी यांनी अनेक खिंडी लढवल्या आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Soha Ali Khan To Produce Ram Jethmalani Biopic Starring Husband Kunal Kemmu? latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV