कमाईच्या बाबतीत 'सोनू के टिटू की स्‍वीटी'ने 'पॅडमॅन'ला मागे टाकलं!

विशेष बाब म्हणजे कमाईच्या बाबतीत या सिनेमाने अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'लाही मागे टाकलं आहे.

कमाईच्या बाबतीत 'सोनू के टिटू की स्‍वीटी'ने 'पॅडमॅन'ला मागे टाकलं!

मुंबई : कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा आणि सनी सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला 'सोनी के टिटू की स्विटी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरु आहे. विशेष बाब म्हणजे कमाईच्या बाबतीत या सिनेमाने अक्षय कुमारच्या 'पॅडमॅन'लाही मागे टाकलं आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, 'सोनू के टिटू की स्विटी'ने आतापर्यंत 82.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 'पॅडमॅन'ने 81 कोटींचा बिझनेस केला होता. या कमाईसह हा चित्रपट 2018 वर्षातील सर्वाधिक गल्ला जमावणारा दुसरा चित्रपट बनला आहे. सर्वाधिक कमाई दीपिका, रणवीर आणि शाहिदची भूमिका असलेल्या 'पद्मावत'ने केली आहे.'सोनू के टिटू की स्विटी' 23 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने तिसऱ्या आठवड्याच्या शुक्रवारी 2.27 कोटी आणि शनिवारी 4.12 कोटी रुपयांची कमाई केली. अशा रितीने हा चित्रपट सुपरहिट कॅटेगरीत सामील झाला आहे.

'सोनू के टिटू की स्विटी'चं दिग्दर्शन 'प्यार का पंचनामा' फेम डायरेक्टर लव रंजन यांनी केलं आहे. या सिनेमात आलोक नाथ आणि वीरेंद्र सक्सेना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sonu Ke Titu Ki Sweety crosses Padman in box office collection
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV