...म्हणून 'तिच्या' आठवणींत श्रीदेवी कॅमेरासमोर ढसाढसा रडली!

By: | Last Updated: > Monday, 10 July 2017 8:28 PM
sridevi cried says she is missing her onscreen daughter sajal ali

नवी दिल्ली : बॉलिवूडची हवाहवाई श्रीदेवीचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘मॉम’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तीनच दिवसात या सिनेमाने 14.40 कोटीची कमाई केली आहे. पण सध्या या सिनेमाच्या निमित्त श्रीदेवीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या व्हिडीओत ती ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळत आहे.

श्रीदेवीच्या ‘मॉम’ सिनेमातील अभिनयाचं सर्वत्रच कौतुक होत आहे. याशिवाय सिनेमात तिच्या मुलीची भूमिका साकरणाऱ्या सेजल अली आणि अदनान सिद्दीकी यांच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक होत आहे. त्यामुळे सिनेमातील सेजल आणि अदनान सिद्दकीच्या अभिनयाचं कौतुक करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी ती सेजलच्या आठवणींनी ढसाढसा रडली.

 

वास्तविक, ‘मॉम’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी आणि सेजल अलीचं कमालीचं बॉडिंग पाहायला मिळालं. शूटिंगच्या सेटवरही सेजल श्रीदेवीकडे खऱ्या मुलीप्रमाणे हट्ट करायची. त्याचमुळे श्रीदेवीचा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतूनही श्रीदेवी आणि सेजलमधील नाते संबंध दिसून येत आहेत. तिच्या आठवणींने श्रीदेवीला आपल्या भावना अनावर झाल्या.

सेजल अली ही एक पाकिस्तानी अभिनेत्री असून, तिनेच श्रीदेवीचा हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का असल्याचं म्हटलं आहे. तसेच मी स्वत: ला थांबवू शकत नाही. माझ्याकडेही शब्द नाहीत, असंही तिने पुढं लिहिलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काही राजकीय पक्षांनी पाकिस्तानी कलाकारांना विरोध केला होता. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली. त्यामुळेच ‘मॉम’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी सेजल आणि अदनान सिद्दीकी भारतात येऊ शकले नव्हते. त्यामुळे सिनेमाच्या प्रमोशनची जबाबदारी श्रीदेवीवरच होती.

उरी हल्ल्यापूर्वीच मॉम सिनेमाचं शूटिंग सुरु झाल्याने, सेजल आणि अदनान यांना घेऊनच सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:sridevi cried says she is missing her onscreen daughter sajal ali
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!
सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे.

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर
येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा

अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक
अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक झाला

भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये

मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच

... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!
... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता

म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द
म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द

मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील

आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल
आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल

मुंबई : यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न