श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

अभिनेत्री श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता अशी माहिती त्यांचा दीर आणि अभिनेता संजय कपूर याने दिली आहे.

श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

दुबई : अभिनेत्री श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता अशी माहिती त्यांचा दीर आणि अभिनेता संजय कपूर याने दिली आहे. श्रीदेवी यांच्या आकस्मिक मृत्यूनं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्री जवळजवळ 11 वाजेच्या दरम्यान, कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या 54व्या श्रीदेवी यांचं निधन झालं.

या घटनेची माहिती मिळताच संजय कपूर तात्काळ दुबईला रवाना झाला. त्यावेळी खलीजा टाइम्सशी बोलताना संजय म्हणाला की, 'आम्हाला प्रचंड धक्का बसला आहे. कारण याआधी त्यांना हृदयासंबंधी कोणताही विकार जडलेला नव्हता.'

संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.

शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती.

संबंधित बातम्या :

'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: sridevi had no heart related problems says sanjay kapoor latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV