जेव्हा महिलेला आव्हान दिलं जातं, श्रीदेवीच्या 'मॉम'चं पोस्टर रिलीज

जेव्हा महिलेला आव्हान दिलं जातं, श्रीदेवीच्या 'मॉम'चं पोस्टर रिलीज

मुंबई : सामान्य गृहिणीचा अनोखा प्रवास मांडणाऱ्या 'इंग्लिश विंग्लिश'मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवी आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. पती बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या 'मॉम' चित्रपटात श्रीदेवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

श्रीदेवीने ट्विटरवरुन या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. जेव्हा एका आईला ललकारता, असं कॅप्शन देऊन हे गूढ पोस्टर शेअर केलं आहे. रवी उद्यावर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'मॉम' या चित्रपटाचं कथानक गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. 14 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

श्रीदेवीसोबतच अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंग, पितोबाश त्रिपाठी हे कलाकार चित्रपटात आहेत, तर नवाझुद्दिन सिद्दीकी पाहुण्या कलाकाराच्या रुपात झळकणार आहे. पाकिस्तानी कलाकारांविरोधात फतवा निघाल्यानंतर 'मॉम' चित्रपटाला फटका बसला होता. अदनान सिद्दीकी आणि सजल अली हे कलाकार अनुक्रमे श्रीदेवीच्या पती आणि मुलीच्या भूमिकेत आहेत.

https://twitter.com/SrideviBKapoor/status/841478246420029440

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV