हृदयविकाराच्या झटक्यानेच श्रीदेवींचा मृत्यू : सूत्र

अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरात कोणत्याही विषाचा अंश सापडलेला नसल्याचं म्हटलं आहे.

हृदयविकाराच्या झटक्यानेच श्रीदेवींचा मृत्यू : सूत्र

दुबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानेच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरात कोणत्याही विषाचा अंश सापडलेला नसल्याचं म्हटलं आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली असून अधिकृत अहवाल थोड्याच वेळात जाहीर केला जाईल.

दरम्यान, श्रीदेवी यांचं पार्थिव आता रात्री उशिरापर्यंत मुंबईत पोहोचेल, अशी माहिती समजते  आहे. शनिवार (24 फेब्रुवारी) श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला, असं सांगितलं जातं होतं. मात्र, त्याला कोणतीही अधिकृत पुष्ठी नव्हती.

मात्र, आता शवविच्छेदन अहवालात श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराच्याच झटक्यानं झाल्याची माहिती समोर आली आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विमानतळावर इमिग्रेशन आणि कस्टम विभाग आपली कारवाई करतील, त्यानंतर त्यांचं पार्थिव मुंबईला आणलं जाणार आहे.

पहिली सुपरस्टार अभिनेत्री

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. श्री अम्मा यंगर अय्यपन म्हणजेच श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे.

वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी थुनैवन या तामिळ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. 1971 मध्ये वयाच्या अवघ्या 8 व्या वर्षी त्यांना पुम्बाता या मल्ल्याळम चित्रपटासाठी केरळचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

1975 मध्ये ज्युली या बॉलिवूडपटातून श्रीदेवींनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. त्या चित्रपटात नायिका लक्ष्मीच्या धाकट्या बहिणीची भूमिका श्रीदेवी यांनी रंगवली होती.

वयाच्या 13 व्या वर्षी मूंद्रू मुदिचू (1976) हा श्रीदेवींनी केलेला तामिळ चित्रपट प्रौढ कलाकार म्हणून पहिला सिनेमा मानला जातो. 1979 मध्ये प्रदर्शित झालेला सोलवा सावन हा श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूडपट ठरला.

हिम्मतवाला, सदमामुळे यशोशिखरावर

श्रीदेवी यांच्या नावाचा खरा गवगवा झाला तो 1983 साली प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला चित्रपटानं. जीतेंद्र आणि श्रीदेवी या जोडीनं मग मवालीमकसदजस्टिस चौधरी असे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिले. 

कमल हासनसोबतच्या सदमा या चित्रपटातल्या श्रीदेवी यांच्या अभिनयाला समीक्षकांकडून कौतुकाची पावती मिळाली. मग चांदनीलम्हेमिस्टर इंडियाखुदा गवाहनगिनाचालबाज यासारख्या चित्रपटांमधल्या भूमिकांनी हिंदी चित्रपटांच्या दुनियेत त्यांचं एक वेगळं वलय निर्माण झालं. मिस्टर इंडिया या चित्रपटातल्या एका नृत्यानं त्यांना मिस हवाहवाई हे टोपणनाव मिळवून दिलं होतं.

मिथुन चक्रवर्तीशी विवाह

श्रीदेवी यांनी ऐन भरात असताना मिथुन चक्रवर्तीशी केलेला पहिला विवाह अवघी तीन वर्षे टिकला. त्या दोघांनी 1988 साली घटस्फोट घेतला. त्यानंतर श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यात जवळीक निर्माण झाली. 1996 साली त्या दोघांनी लग्न केलं. हे बोनी यांचं दुसरं लग्न होतं. 

1997 साली केलेल्या जुदाई चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी जवळपास 15 वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. 

15 वर्षांनी पुनरागमन

2012 मध्ये गौरी शिंदे दिग्दर्शित इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून श्रीदेवींनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. या चित्रपटातून त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. 2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'मॉम' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना 2013 साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट अखेरचा ठरला. शाहरुख खानच्या आगामी 'झिरो' चित्रपटाचं शूटिंग त्या करत होत्या.

रिअल लाईफमधला दीर, अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत त्यांनी साकारलेल्या अनेक चित्रपटातील भूमिका गाजल्या. श्रीदेवी यांच्या बहुतांश यशस्वी चित्रपटांची निर्मिती पती बोनी कपूर यांनी केली आहे. अभिनेते संजय कपूरही त्यांचे दीर आहेत.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून पदार्पण करणार होती. मात्र लेकीचा पहिला चित्रपट पाहण्यापूर्वीच त्यांनी निरोप घेतला.

गाजलेले चित्रपट

1983- सदमा
1983- हिम्मतवाला
1983- जस्टिस चौधरी
1983- मवाली
1983- कलाकार
1984- तोहफा
1986- नगिना
1986- आग और शोला
1986- कर्मा
1986- सुहागन
1987 - औलाद
1987 - मिस्टर इंडिया
1989 - निगाहे (नगिना भाग 2)
1989 - चांदनी
1989 - चालबाज (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1991 - फरिश्ते
1991 - लम्हे (सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर)
1992 - खुदा गवाह
1992 - हीर रांझा
1993 - रुप की रानी चोरों का राजा
1993 - गुमराह
1993 - चंद्रमुखी
1994 - लाडला
1997 - जुदाई

2004 - सहारा वन चॅनलवर मालिनी अय्यर या दैनंदिन मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री

2012 - इंग्लिश विंग्लिश
2017 - मॉम

संबंधित बातम्या :

नवा दावा - श्रीदेवींना बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत हॉटेल स्टाफने पाहिलं!

श्रीदेवी यांना हृदयासंबंधी कोणताही विकार नव्हता : संजय कपूर

'श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळल्या', खलीज टाइम्सचा दावा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sridevi’s death due to heart attack source latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV