राजमौलींच्या नव्या सिनेमाचा विषय ठरला, बिग बी, आमीर एकत्र

By: | Last Updated: > Friday, 14 April 2017 4:04 PM
SS Rajamouli confirms meeting Aamir Khan, next film on Mahabharat live update

मुंबई : बहुप्रतीक्षित बाहुबली चित्रपटाचा दुसरा भाग अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ येत्या 28 एप्रिलला प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. मात्र दिग्दर्शक राजमौली यांच्या डोक्यात पुढील सिनेमाची गणितं शिजायला सुरुवात झाली आहे. राजमौलींचा आगामी चित्रपट महाभारतावर आधारित असून बिग बी, आमिर खान यांची निवड झाल्याची माहिती आहे.

अमिताभ बच्चन, आमिर खान, मोहनलाल या आघाडीच्या अभिनेत्यांना एकत्र आणून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे. 2018 मध्ये याच्या निर्मितीला सुरुवात होईल. 400 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. तमिळ, तेलुगू, हिंदी या तीन भाषेत चित्रपटाची निर्मिती होईल.

‘सध्या माझं पूर्ण लक्ष बाहुबलीच्या दुसऱ्या भागावर. दुसरे कोणतेही विचार माझ्या डोक्यात नाहीत. बाहुबलीनंतर लगेचच महाभारतावर चित्रपट आणण्याची शक्यता कमी आहे. हा माझा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने त्याचे कलाकार, तंत्रज्ञ यांची जुळवाजुळव करायला वेळ लागेल.’ असं राजमौली म्हणाले. आमिर खानची भेट घेतल्याचं राजमौली यांनी स्पष्ट केलं. या विषयावर आमिर सकारात्मक आहे, असंही ते म्हणाले.

येत्या 28 एप्रिलला ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाहुबलीचा पहिला भाग पुनर्प्रदर्शित करण्याचा घाट निर्मात्यांनी घातला, मात्र प्रेक्षकांनी याकडे सपशेल पाठ फिरवली.

एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, तमन्ना भाटिया यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.

बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र यावेळी त्याच्या दहा टक्केही कलेक्शन बॉक्स ऑफिसवर होऊ शकलेलं नाही. भारतीय चित्रपटाच्या इतिहासात बाहुबली हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

संबंधित बातम्या

PHOTO: कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:SS Rajamouli confirms meeting Aamir Khan, next film on Mahabharat live update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर

आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट
आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?
'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या