रोमँटिक थ्रिलर 'तेरा इंतजार'चा ट्रेलर रिलीज, सनी लिओनीचे बोल्ड सीन

अरबाज खान आणि सनी लिओनी ही जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रोमँटिक थ्रिलर 'तेरा इंतजार'चा ट्रेलर रिलीज, सनी लिओनीचे बोल्ड सीन

मुंबई : बॉलिवूडची 'बेबी डॉल' अर्थात अभिनेत्री सनी लिओनीच्या आगामी 'तेरा इंतजार' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता अरबाज खानही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.

या सिनेमात लव्ह स्टोरी, सस्पेन्स, आयटम साँग, रोमँटिक सीन असा पूरेपूर फिल्मी मसाला आहे. सनी लिओनीचा बोल्ड अवतार असलेले अरबाजसोबतचे रोमँटिक सीनही या सिनेमात आहेत.

अरबाज खान आणि सनी लिओनी ही जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक राजीव वालिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सनी लिओनी, अरबाज खान यांच्यासोबतच गौहर खान आणि आर्य बब्बरही आहे. अमन मेहता आणि बिजल मेहता यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

येत्या 24 नोव्हेंबर रोजी 'तेरा इंतजार' सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sunney Leone’s Tera intezaar trailer released latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV