सनीच्या गाली 'डिम्पल', जुन्या नात्यांना लंडनमध्ये उजाळा

सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सनीच्या गाली 'डिम्पल', जुन्या नात्यांना लंडनमध्ये उजाळा

मुंबई : बॉलिवूड, अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजोड आहे. काही जुनी अफेअर्स अनेक वर्षानंतर अजूनही ताजीतवानी आणि जिवंत आहेत. नुकतंच याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिम्पल कपाडिया आणि 'ढाई किलो का हात' फेम अॅक्शन हिरो सनी देओल.

सनी देओल आणि डिम्पल कपाडिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 9 ऑगस्ट रोजी काढलेला व्हिडिओ एका यूझरने यूट्यूबवर अपलोड केला आहे. लंडनमध्ये एका बसस्टॉपवर डिम्पल आणि सनी एकमेकांचा हात हातात घट्ट धरुन बसलेले दिसत आहेत. दोघंही एकदम रिलॅक्स मूडमध्ये आहेत. डिम्पलच्या दुसऱ्या हातात असणारी सिगरेट तिचा चिलिंग मूड दाखवत आहेत.

सनी आणि डिम्पल यांचं नातं 11 वर्ष जुनं आहे. दोघंही प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्या नात्याच्या चर्चा चांगल्याच रंगायच्या. मात्र आता दोघंही वयाच्या साठीत असताना जुन्या नात्याला उजाळा मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

सनी आणि डिम्पल मंझिल मंझिल, गुनाह, अर्जुन, आग का गोला यासारख्या चित्रपटात एकत्र झळकले होते. त्यांच्यावर चित्रित झालेली 'ओ मेरी जान...' सारखी रोमँटिक गाणीही गाजली आहेत.

सनी देओल पूजासोबत विवाहबंधनात अडकला, तर डिम्पलने राजेश खन्नाशी लगीनगाठ बांधली होती. सनीचा मुलगा करण लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

पाहा व्हिडिओ :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV