बॉक्स ऑफिसच नव्हे, 'सर्च बॉक्स'मध्येही सनी लिओनी अव्वल

सनी लिओनीने टॉप-10 मोस्ट सर्च फिमेल सेलिब्रिटीजच्या यादीत ऐश्वर्या रॉय, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, करिना कपूर यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे.

बॉक्स ऑफिसच नव्हे, 'सर्च बॉक्स'मध्येही सनी लिओनी अव्वल

मुंबई :  बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनीचा 'तेरा इंतजार' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर भलेही कमी कमाई करत असेल, मात्र सर्च बॉक्सवर सनी लिओनीचाच जलवा दिसून येतोय. याहू इंडियाच्या टॉप-10 मोस्ट सर्च फिमेल सेलिब्रिटीजमध्ये सनी लिओनी पहिल्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे, सनी लिओनीने टॉप-10 मोस्ट सर्च फिमेल सेलिब्रिटीजच्या यादीत ऐश्वर्या रॉय, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा, करिना कपूर यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. खरंतर यंदा सनी लिओनीचा एकही बिग बजेट म्हणावा असा किंवा मोठ्या सुपरस्टारसोबतचा सिनेमाही प्रदर्शित झालेला नाही, तरीही सनी लिओनीने सर्च बॉक्समधील आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

सनी लिओनीने यंदा निशा नामक मुलीला दत्तक घेतलं. त्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. अर्थात, चर्चा होणं हे काही सनीसाठी नवीन नाही. मात्र मुलगी दत्तक घेतल्याने सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. त्या दरम्यान सनी लिओनी जास्त सर्च झाल्याचे दिसून येते. खरंतर सनी लिओनी वर्षाच्या बाराही महिने सर्च बॉक्समध्ये असतेच.

याहू इंडियाची टॉप-10 मोस्ट सर्च सेलिब्रेटीजची यादी :

1. सनी लिओनी
2. प्रियंका चोप्रा
3. ऐश्वर्या राय-बच्चन
4. कतरिना कैफ
5. दीपिका पदुकोण
6. करिना कपूर-खान
7. ममता कुलकर्णी
8. दिशा पटानी
9. काव्या माधवन
10. ईशा गुप्ता

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Sunny Leone in Yahoo India’s Top search list latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV