सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात

दक्षिणेतले दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि मामुटी लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहेत. ‘पसायदान’ असं या सिनेमाचं नाव असून, त्यात या दोघांची मुख्य भूमिका असेल.

सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात

मुंबई : दक्षिणेतले दिग्गज अभिनेते रजनीकांत आणि मामुटी लवकरच मराठी सिनेमात झळकणार आहेत. ‘पसायदान’ असं या सिनेमाचं नाव असून, त्यात या दोघांची मुख्य भूमिका असेल.

बाळकृष्ण सुर्वे या सिनमाची निर्मिती करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. दिपकने लिहिलेला 'इडक' या सिनेमाची इफ्फी मध्ये निवड झाली आहे.

मूळचे महाराष्ट्रीयन असलेले सुपरस्टार रजनीकांत यांचं कर्मभूमीसह जन्मभूमीवरही तितकच प्रेम आहे. तामिळ भाषेतील त्यांच्या सिनेमांचे असंख्य विक्रम आहेत, मात्र मराठीत त्यांचा एकही सिनेमा नाही. भारतीय सिनेसृष्टीत ते सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार म्हणूनही ओळखला जातात. त्यांच्या सिनेमाचे बजेटही मोठे असते.

पण आता ते लवकरच मराठी सिनेमातही काम करताना दिसणार आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे माजी उपाध्यक्ष बाळकृष्ण सुर्वे रजनीकांत आणि मामुटी यांना घेऊन लवकरच सिनेमा करणार आहेत.

या सिनेमात रजनीकांत आणि मामुटी पसायदानवर चर्चा करताना दिसतील.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत सध्या '0.2' आणि 'काला कारिकलन' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमाचं शूटिंग संपल्यानंतर 'पसायदान'चं शूटिंग सुरु होणार आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सिनेमाचं शूटिंग सुरु होणार असल्याचं बाळकृष्ण सुर्वेंनी सांगितलं.

दरम्यान, रजनीकांतच्या आधी बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितही लवकरच मराठी सिनेमात दिसणार आहे. ब्लू मस्टँग क्रिएशन्स आणि दार मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या आगामी मराठी चित्रपटात माधुरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तेजस देऊस्कर याच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून दिवाळीनंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल, अशी माहित आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: superstar rajnikant in upcoming marathi movie latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV