चाहत्याला चपराक प्रकरण, गोविंदाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

By: | Last Updated: > Wednesday, 12 July 2017 4:22 PM
Supreme Court asks actor Govinda to apologise to person for slapping latest update

नवी दिल्ली : चाहत्याला चपराक लगावल्याप्रकरणी अभिनेता गोविंदाला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार गोविंदा 9 वर्षांनी चाहत्याची बिनशर्त माफी मागण्यास तयार झाला आहे. त्यामुळे कोर्टाने केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

16 जानेवारी 2008 रोजी गोविंदाने संतोष रायला चपराक लागवली होती. घटनेच्या तब्बल नऊ वर्षांनंतर गोविंदाने सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. त्याचप्रमाणे संतोषला 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तयारीही त्याने दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला मंजुरी दिली असून केस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने दोन्ही पक्षांना दोन आठवड्यांत समेट घडवण्याचा सल्ला दिला होता. ‘तू हिरो आहेस, तू कोणाला कानशिलात कशी लगावू शकतोस?’ असं कोर्टाने गोविंदाला विचारलं होतं.

‘तुझे चित्रपट आम्ही एन्जॉय करतो. मात्र तू कोणाला मारावंस, हे आम्ही सहन करु शकत नाही. रील लाईफ आणि रियल लाईफ यातला भेद तू समजून घ्यायला हवास. मोठा हिरो आहेस, मन पण मोठं कर. सामान्य माणसाला चपराक लगावणं तुला शोभत नाही.’ असं कोर्ट म्हणालं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Supreme Court asks actor Govinda to apologise to person for slapping latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!
सनी लिऑन आई बनली, लातूरची मुलगी दत्तक घेतली!

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑनने मुलगी दत्तक घेतली आहे.

येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर
येत्या दोन वर्षात तीन ऐतिहासिक शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

मुंबई : झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’

नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर
नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर

मुंबई : तो लढला, त्याच्या माणसांसाठी, त्याच्या मातीसाठी आणि त्याचा

अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक
अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री संजना गलरानीचा न्यूड व्हिडीओ लीक झाला

भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये
भन्साळींच्या भाचीसोबत जावेद जाफ्रीचा मुलगा बॉलिवूडमध्ये

मुंबई : डान्सर आणि विनोदी अभिनेता जावेद जाफ्रीचा मुलगा लवकरच

... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!
... म्हणून IIFA मध्ये आमिरच्या 'दंगल'ला एकही पुरस्कार नाही!

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये गेल्या आठवड्यात आयफा सोहळा पार पडला. अभिनेता

म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द
म्हणून 22 वर्षांत पहिल्यांदाच मराठा मंदिरला 'डीडीएलजे'चा शो रद्द

मुंबई : मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात ‘दिलवाले दुल्हनिया ले

ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं निधन झालं. मुंबईतील

आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल
आयफामधील लूकवरुन सोनाक्षी सिन्हा ट्रोल

मुंबई : यंदाचा आयफा पुरस्कार सोहळा नुकताच न्यूयॉर्कमध्ये संपन्न