'टारझन द वंडर कार'फेम वत्सल शेठ-इशिता दत्ता विवाहबंधनात

आगामी फिरंगी सिनेमात इशिता कपिल शर्मासोबत दिसणार आहे.

'टारझन द वंडर कार'फेम वत्सल शेठ-इशिता दत्ता विवाहबंधनात

मुंबई : 'टारझन द वंडर कार' फेम अभिनेता वत्सल शेठ विवाहबंधनात अडकला आहे. दृश्यम आणि आगामी फिरंगी चित्रपटात झळकलेली अभिनेत्री इशिता दत्तासोबत वत्सलने गुपचूप लगीनगाठ बांधली. इशिता ही अभिनेत्री तनुश्री दत्ताची धाकटी बहीण आहे.

28 नोव्हेंबरला मुंबईतील जुहूमधल्या इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस मंदिरात दोघं विवाहबद्ध झाले. मोजके मित्र, नातेवाईक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींच्या उपस्थितीत लग्न पार पडलं. लग्नाला अजय देवगन-काजोल सहकुटुंब आले होते. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, काजोलची धाकटी बहीण आणि अभिनेत्री तनिषा, बॉबी देओल उपस्थित होते.

इंटरेस्टिंग म्हणजे, 'टारझन द वंडर कार' या चित्रपटात वत्सलने अजय देवगनच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली होती, तर दृश्यम चित्रपटात इशिताने अजयच्या मुलीची म्हणजेच अनूची भूमिका केली होती. आगामी फिरंगी सिनेमात इशिता कपिल शर्मासोबत दिसणार आहे.

झारखंडच्या जमशेदपूरमध्ये राहणारी इशिता दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली आहे.  'रिश्तों का सौदागर- बाजीगर' या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. तिचं बारावीपर्यंत शिक्षण जमशेदपूरमध्ये झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती मुंबईत बहीण तनुश्रीकडे राहायला आली.

सोफिया कॉलेजमधून इशिताने मास कम्युनिकेशन विषयात पदवी मिळवली. त्यानंतर अनुपम खेर यांच्या इन्स्टिट्यूटमधून तिने अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Tarzan the wonder car fame actor Vatsal Sheth marries actress Ishita Dutta latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV